Ind vs Aus 2nd T20 : टीम इंडियाची लज्जास्पद कामगिरी, मेलबर्नमध्ये थांबला 17 वर्षांचा विजय रथ, ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सनी विजय
Australia beat India 2nd T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नमध्ये खेळवण्यात आला.

Australia beat India 2nd T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर सहज विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मालिकेचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा होता, पण टीम इंडिया ही संधी साधू शकली नाही. आता भारताला ही मालिका जिंकायची असेल, तर पुढील तीनही सामने जिंकावे लागतील.
More than 82,000 fans packed out the MCG as Mitch Marsh and Josh Hazlewood put on a show. #AUSvIND
— cricket.com.au (@cricketcomau) October 31, 2025
Match report: https://t.co/jx8eJV0Xvl pic.twitter.com/x2DZ96xN8v
मेलबर्नमध्ये थांबला 17 वर्षांचा विजय रथ
या सामन्यापूर्वी भारतीय संघाने मेलबर्नच्या ऐतिहासिक MCG मैदानावर एकूण 6 टी-20 सामने खेळले होते, ज्यापैकी 4 मध्ये विजय मिळवला होता आणि फक्त एकदाच पराभव पत्करला होता तोही 2008 साली. त्यानंतर 17 वर्षांपर्यंत भारत या मैदानावर अपराजित राहिला होता, पण अखेर हा विजय रथ थांबला.
ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सनी दमदार विजय
भारताने दिलेल्या 126 धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने झंझावाती सुरुवात केली आणि फक्त 13.2 षटकांत विजय मिळवला. कर्णधार मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. मार्श 26 चेंडूत 46 धावा करून बाद झाला, तर हेड 15 चेंडूत 28 धावा करून माघारी परतला. जोश इंग्लिस (20), टिम डेविड (1), मिचेल ओव्हन (14) आणि मॅथ्यू शॉर्ट (0) यांचेही विकेट्स भारताने घेतले. जसप्रीत बुमराहने एका षटकात सलग दोन विकेट्स घेतल्या. शेवटी मार्कस स्टोइनिसने 6 चेंडूत 6 धावा करत 13.2 षटकांत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.
Australia win the second T20I by 4 wickets.#TeamIndia will look to bounce back in the next match.
— BCCI (@BCCI) October 31, 2025
Scorecard ▶ https://t.co/7LOFHGtfXe#AUSvIND pic.twitter.com/rVsd9Md9qh
भारताची फलंदाजी पुन्हा ढेपाळली
भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात अत्यंत निराशाजनक फलंदाजी केली. केवळ दोन फलंदाज दहाच्या पुढे धावा करू शकले. अभिषेक शर्मा (68) आणि हर्षित राणा (35) या दोघांच्या जोरावरच भारताने 125 धावांपर्यंत मजल मारली. पॉवरप्लेमध्ये भारताने केवळ 40 धावांत 4 गडी गमावले होते. परिणामी, ऑस्ट्रेलियासमोर 126 धावांचे मामुली लक्ष्य ठेवण्यात आले, जे त्यांनी सहज पूर्ण केले.
हे ही वाचा -





















