IND vs AUS : बॉर्डर गावसकर ट्रॉफीपूर्वी संघाला मोठा धक्का, स्टार खेळाडू 6 महिने क्रिकेटच्या मैदानातून बाहेर
IND vs AUS Border Gavaskar Trophy 2024 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. भारताने गेल्या चार वेळा ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका जिंकली आहे.
Australia all-rounder Cameron Green ruled out from Border-Gavaskar Trophy : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळवली जाणार आहे. पण याआधीच ऑस्ट्रेलियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा स्टार अष्टपैलू कॅमेरून ग्रीन दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या मालिकेतून आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर गेला आहे. ग्रीनने यापूर्वी चांगली कामगिरी करत संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले होते.
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात झाली दुखापत
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कॅमेरून ग्रीनला दुखापत झाली होती. यानंतर, स्कॅनमध्ये त्याला स्ट्रेस फ्रॅक्चर झाल्याचे निदान झाले आणि आता त्याने पाठीवर शस्त्रक्रिया करण्याचा पर्याय निवडला आहे. आता त्याला बरे होण्यासाठी किमान 6 महिने लागतील. याच कारणामुळे तो भारताविरुद्ध होणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी आणि श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतूनही तो बाहेर पडणे जवळपास निश्चित आहे. कारण चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फेब्रुवारीमध्ये पाकिस्तानच्या भूमीवर होणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अहवालानुसार त्याचे आयपीएलमध्ये खेळणेही धोक्यात आले आहे.
Cameron Green is set to be out for six months due to a back stress fracture. The all-rounder is expected to undergo surgery soon.#australia #cricket #AUSvPAK #AUSvIND pic.twitter.com/7VvF796yfS
— Cricbuzz (@cricbuzz) October 14, 2024
भारताविरुद्धच्या मालिकेला मुकणार
कॅमेरून ग्रीनला वगळण्यात आल्याने ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे, कारण ग्रीन हा त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजी आणि मधल्या फळीत दमदार फलंदाजीसाठी ओळखला जातो. भारताविरुद्धच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला त्याची उणीव भासेल. ग्रीनला ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जेम्स पॅटिनसन आणि भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सारखीच दुखापत झाली आहे.
कॅमेरून ग्रीनने 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून कसोटी पदार्पण केले. तेव्हापासून तो संघाचा महत्त्वाचा दुवा बनला आहे. त्याने आतापर्यंत ऑस्ट्रेलियासाठी 28 कसोटी सामन्यांमध्ये 1377 धावा आणि 35 बळी घेतले आहेत. त्याने दोन शतके आणि 6 अर्धशतकेही झळकावली आहेत. ग्रीनने ऑस्ट्रेलियासाठी 28 एकदिवसीय आणि 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत.
हे ही वाचा -
IPL 2025 मेगा लिलावाबाबत मोठी अपडेट..., श्रीमंतांच्या 'या' शहरात समुद्र किनारी होणार लिलाव
Mumbai Indians : लिलावाआधी मुंबई इंडियन्सने उचलले मोठे पाऊल; रोहित शर्मा पुन्हा होणार कर्णधार?