VIDEO: सिराजची आग ओकणारी ' ती ' ओव्हर, एक एक बॉल तोफगोळा बनून आला, 4 विकेट घेऊन गेला !!
Ind Vs Sl Final: मियां भाई की डेयरिंग... मोहम्मद सिराजने एकाच षटकात घेतल्या 4 विकेट
Asia Cup 2023 Final : आशिया चषकाच्या फायनल सामन्यात मोहम्मद सिराज याने आग ओकणारी गोलंदाजी केली आहे. सिराजच्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी गुडघे टेकले.. एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही. मोहम्मद सिराज याने श्रीलंकेच्या पाच फलंदाजांना तंबूत धाडलेय. सिराज आणि बुमराह यांच्या माऱ्यापुढे श्रीलंका संघाचा अवस्था दारुण झाली आहे. सिराज याने एकाच षटकात चार विकेट घेत श्रीलंकेचे कंबरडे मोडले.
मोहम्मद सिराज याने एकापाठोपाठ एक विकेट घेत आशिया चषकाच्या फायनल सामन्यात दमदार कामगिरी केली. सिराजच्या माऱ्यापुढे श्रीलंकेच्या फलंदाज फेल ठरले.
Make that FOUR wickets in an over 🤯
— BCCI (@BCCI) September 17, 2023
🔝 bowling this from @mdsirajofficial 😎#TeamIndia on a roll with the ball and Sri Lanka are 12/5.
Follow the match ▶️ https://t.co/xrKl5d85dN#AsiaCup2023 | #INDvSL https://t.co/eB1955UBDo pic.twitter.com/kaZcVOk1AZ
आशिया चषकच्या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय भारताच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. आधी जसप्रीत बुमराह याने श्रीलंकेचा सलामीवीर कुसल परेरा याला पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर तंबूत गेला. त्यानंतर मोहम्मद सिराज याने भेदक मारा केला. सिराज याने एकाच षटकात एक दोन नव्हे चार विकेट घेतल्या.
Mohammad Siraj becomes the 4th fastest Indian to complete 50 ODI wickets.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 17, 2023
What a performer! pic.twitter.com/Wpac1hSQZa
मोहम्मद सिराज त्याचे दुसरे षटक टाकण्यासाठी आला. त्याने यावेळी पहिल्याच चेंडूवर पथुम निसांका याला दोन धावांवर रविंद्र जाडेजा याच्या हातून झेलबाद केले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर सिराजने सदीरा समरविक्रमा याला शून्यावर तंबूत धाडले. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या चरिथ असलंका यालाही सिराजने चौथ्या चेंडूवर शून्यावर बाद केले. लागोपाठ दोन विकेट घेतल्यानंतर सिराज हॅट्ट्रिकवर होता. पण पाचव्या चेंडूवर सिराजला चौकार ठोकला. पण सहाव्या चेंडूवर सिराजने पुन्हा विकेट घेतली. सिराजने धनंजय डी सिल्वा याला 4 धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. अशाप्रकारे सिराजने अवघ्या 1 षटकात 4 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.
3.1 षटक : पथुम निशांका याला रविंद्र जाडेजाच्या हातात झेलबाद केले.
3.2 षटक : डॉट बॉल
3.3 षटक : सदीरा समरविक्रमा याला एलबीडब्ल्यू बाद केले.
3.4 षटक : चरिथ असालंका याला इशान किशनकरवी झेलबाद केले.
3.5 षटक : धनंजय डी सिल्वा याने चौकार ठोकला.
3.6 षटक : धनंजय डी सिल्वा विकेटकीपरकडे झेल देऊन तंबूत परतला.
The historical over of Mohammad Siraj.....!!!
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 17, 2023
4 wickets in a single over. pic.twitter.com/aMd3cihLso
Historic:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 17, 2023
Mohammad Siraj becomes the first Indian to pick 4 wickets in a single over in international cricket. pic.twitter.com/CrHcbg4xU1
One of the greatest ever opening spells in the history of a tournament's Final.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 17, 2023
Mohammad Siraj picked up 4 wickets in a single over! pic.twitter.com/G8A35uAufI