Ashes 2021: इंग्लंडच्या माजी कर्णधारानं ऐतिहासिक अॅशेस मालिका रद्द करण्याची केली मागणी; कारण जाणून घ्या
या वर्षाच्या अखेरीस अॅशेस मालिका ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित केली जाणार आहे. परंतु, कोविड प्रोटोकॉलमुळे इंग्लंडचे खेळाडू या मालिकेदरम्यान आपल्या कुटुंबियांना ऑस्ट्रेलियामध्ये घेऊन जाऊ शकत नाही.
नवी दिल्ली : जर इंग्लिश खेळाडूंची कुटुंबं ऑस्ट्रेलियामध्ये जाऊ शकत नसतील तर यंदाची अॅशेस मालिका रद्द केली पाहिजे, असं वक्तव्य इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने केलं आहे. इंग्लिश क्रिकेटपटू अॅशेस मालिकेसाठी यावर्षी नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये जाणार आहेत. मात्र, ऑस्ट्रेलियामधील कोरोना प्रोटोकॉलमुळे खेळाडू त्यांच्या कुटुंबियांना सोबत घेऊ शकत नाहीत.
वॉनने ट्विट म्हटलंय..
वॉन यांनी ट्वीट केले की, "इंग्लंडचे क्रिकेटपटू आपल्या कुटुंबातील सदस्यांना अॅशेसमध्ये घेऊन जाता येणार नाही, असा रिपोर्ट वाचण्यात आला. जर ते शक्य नसतील तर अॅशेस रद्द केली जावी. कारण चार महिने आपल्या कुटुंबापासून दूर राहणे मान्य नाही."
Read reports today that England cricketers may not be able to have family members with them down under this winter .. Quite simply if they can’t they should call the Ashes off .. 4 months away from your family is totally unacceptable .. #Ashes
— Michael Vaughan (@MichaelVaughan) June 22, 2021
पीटरसनने केलं होतं विधान
वॉनशिवाय इंग्लंडचा माजी क्रिकेटर केविन पीटरसननेही असे म्हटले आहे की, कुटुबाला घेऊन जाता येत नसल्याने अॅशेसमध्ये कोणता खेळाडू जाण्यास नकार देत असेल तर त्या खेळाडूला पाठिंबा देईन. इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर यानेही अॅशेस जिंकणे एक आव्हान असून कुटुंबाशिवाय ते अधिक कठीण जाईल असे मत व्यक्त केले.
तो म्हणाला होता, की "संघातील बर्याच खेळाडूंना लहान मुलं आहेत, ज्यांना सोडणे त्यांना कठीण जाईल. मला आशा आहे की यावर सकारात्मक तोडगा निघू शकेल." या अहवालानुसार क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ऑस्ट्रेलियन सरकारला इंग्रजी क्रिकेटपटूंना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह आणण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे.