Virat Kohli at Mahakal temple : खराब फॉर्मात विराट कोहली, चौथ्या सामन्यापूर्वी महाकाल देवाच्या मंदिरात
Team India : भारतीय संघाचे खेळाडू अलीकडे विविध ठिकाणी देवदर्शनाला पोहोचत असून अक्षर आणि केएल राहुल यांच्यानंतर आता विराटही पत्नीसोबत उज्जैनमध्ये महाकाल देवाच्या दर्शनाला पोहोचला आहे.
Virat and Anushka at ujjain mahakal temple : भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुल आणि अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलनंतर (Axar Patel) आता स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) देखील उज्जैनच्या महाकाल मंदिरात दर्शनासाठी (ujjain mahakal temple) पोहोचला आहे. विराटदेखील पत्नी अनुष्कासोबत महाकाल देवाच्या दरबारात पोहोचला असून तिथे त्याने भस्म आरतीमध्येही सहभाग घेतला. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात 4 सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेत आतापर्यंत तीन सामने झाले आहेत. ज्यामध्ये 2 सामने टीम इंडियाच्या नावावर आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने या सामन्यातील तिसरा सामना जिंकला आहे. त्याचवेळी, या मालिकेच्या दरम्यान, भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा महाकाल मंदिरात पोहोचला आहे. दोघांचा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
पाहा VIDEO-
Virat Kohli and Anushka Sharma at Mahakal temple, Ujjain🧡pic.twitter.com/3GUMc0EXDd
— Mufaddal Vohra (@mufaddel_vohra) March 4, 2023
Virat Kohli and Anushka Sharma visited the Mahakaleshwar Jyotirlinga Temple. pic.twitter.com/PwCoEYrBAo
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 4, 2023
विराटसह अनुष्काही महाकालच्या दरबारात
भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यापूर्वी प्रार्थना करण्यासाठी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात पोहोचले आहेत. इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीतील पराभव आणि चौथ्या कसोटीपूर्वी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा महाकालच्या दरबारात पोहोचले आहेत. दरम्यान विराट कोहली कसोटी फॉर्मेटमध्ये बऱ्याच काळापासून फॉर्ममध्ये नाही आणि त्याची बॅट शांत आहे. अशा परिस्थितीत महाकालच्या दरबारात पोहोचलेला कोहली आता चौथ्या आणि निर्णायक कसोटीत आपल्या बॅटने चमत्कार करेल आणि मोठी खेळी करेल, अशी आशा चाहत्यांना आहे.
फॅब-4 यादीत विराटची सर्वात खराब फॉर्मात
2019 साली कसोटी फॉरमॅटमध्ये शेवटचे शतक झळकावणाऱ्या विराट कोहलीची फलंदाजीची सरासरीही गेल्या 20 कसोटी डावांमध्ये खूपच खराब आहे. ज्यामध्ये त्याने केवळ 25 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटने फक्त एकदाच 50 हून अधिक धावांची खेळी पाहिली आहे, जी डिसेंबर 2021 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यादरम्यान आली होती. विराट कोहलीच्या तुलनेत, फॅब 4 च्या इतर 3 फलंदाजांची गेल्या 20 कसोटी डावांमधील फलंदाजीची सरासरी पाहिली तर ती खूपच प्रभावी आहे, ज्यात रुटने 66, स्मिथने 60 तर केन विल्यमसनने 59 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
हे देखील वाचा-