Eng vs Ind 4th Test : चौथ्या कसोटीपूर्वी टीम इंडियामध्ये मोठा बदल; अर्शदीप सिंग मालिकेतून बाहेर, 'या' धाकड गोलंदाजाची एन्ट्री
Arshdeep Singh Injured News : भारत आणि इंग्लंड यांच्यात 23 जुलैपासून (बुधवार) मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर चौथा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.

England vs India 4th Test Update : भारत आणि इंग्लंड यांच्यात 23 जुलैपासून (बुधवार) मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर चौथा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. मात्र, या सामन्याआधी भारतीय संघासाठी एक मोठी चिंतेची बातमी समोर आली आहे.
Haryana seamer Anshul Kamboj set to join Indian Test squad in Manchester as a cover for injured pacer Arshdeep Singh #INDvsENG pic.twitter.com/128MAlZbfR
— Press Trust of India (@PTI_News) July 20, 2025
अर्शदीप सिंग दुखापतीमुळे बाहेर
भारतीय संघाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग दुखापतीमुळे चौथ्या कसोटीतून बाहेर झाला आहे. 17 जुलै रोजी सराव सत्रादरम्यान, अर्शदीपला चेंडू अडवताना डाव्या हाताला जखम झाली. त्याला तात्काळ उपचार देण्यात आले, पट्टी बांधण्यात आली आणि नंतर टाकेही घालण्यात आले. बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, अर्शदीपला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी किमान 10 दिवस लागतील.
🚨 A BIG SET-BACK FOR INDIA 🚨
— Johns. (@CricCrazyJohns) July 19, 2025
- Arshdeep Singh likely to be ruled out of the 4th Test against England due to an injury. [Devendra Pandey From Express Sports] pic.twitter.com/ktbRcFuclt
अंशुल कंबोजची टीममध्ये एन्ट्री
अर्शदीपच्या जागी हरियाणाचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. 24 वर्षीय अंशुलने अलीकडेच भारत-A संघाकडून इंग्लंड लॉयन्सविरुद्ध दोन फर्स्ट क्लास सामने खेळले आणि आपल्या वेग व अचूक लाइन-लेंथमुळे निवड समितीचं लक्ष वेधलं. जिथे त्याने दोन तीन दिवसांचे सामने खेळले आणि दोन सामन्यांमध्ये पाच विकेट्सही घेतल्या.
दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावातही कंबोजने 51 धावा केल्या. तसेच, हरियाणासाठी त्याने 24 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 79 विकेट्स घेतल्या आहेत. तो लवकरच इंग्लंडला पोहोचून टीम इंडियामध्ये सामील होईल. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले आहे की, अर्शदीपला खोल दुखापत झाली आहे आणि त्याच्या पायांनाही दुखापत झाली आहे. त्याला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी किमान दहा दिवस लागतील. निवडकर्त्यांनी कंबोजला संघात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
ANSHUL KAMBOJ IN CONTENTION FOR A TEST DEBUT.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 20, 2025
- Akashdeep likely to be rested from the 4th Test. (TOI). pic.twitter.com/y1lhbizhzV
भारताचा 18 सदस्यीय कसोटी संघ : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, के.एल. राहुल, साई सुदर्शन, ऋषभ पंत (उपकर्णधार/यष्टीरक्षक), नीतीश रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), करुण नायर, अभिमन्यू ईश्वरन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, अंशुल कंबोज, कुलदीप यादव.





















