Ajit Pawar on Suryakumar Yadav : आमचे लोक फार वेडे, जिंकल्यावर उदो उदो आणि हरल्यावर दगड मारायला कमी करत नाहीत, विश्वविजेत्या खेळाडूंसमोर अजित पवारांचे बॅटिंग
Ajit Pawar, Mumbai : "सूर्यकुमार यादव तुझं खूप खूप अभिनंदन, खूप कौतुक करतो. आपल्या संपूर्ण भारतीयाचे डोळे तुझ्याकडे लागले होते. मात्र, अप्रतिम झेल तू घेतला. नसता घेतला तर तुला बघितलंच असतं.
Ajit Pawar, Mumbai : "सूर्यकुमार यादव तुझं खूप खूप अभिनंदन, खूप कौतुक करतो. आपल्या संपूर्ण भारतीयाचे डोळे तुझ्याकडे लागले होते. मात्र, अप्रतिम झेल तू घेतला. नसता घेतला तर तुला बघितलंच असतं. रोहितने एकट्यानेच नाही, आम्ही सर्वांनीचं बघितलं असतं. आमचे लोक फार वेडे आहेत, जिंकल्यावर उदो उदो आणि हरल्यावर दगड मारायला कमी करत नाहीत. आपल्या इथे खेळाडूपणा आपल्याला पाहायला मिळत नाही" असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. विधानभवनात विश्वविजेत्या महाराष्ट्रीयन खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल हे देखील उपस्थित होते.
तेव्हा अनेक क्रीडा रसिकांनी आशा सोडली होती
अजित पवार म्हणाले, राज्यात यापूर्वी कधीही असा कार्यक्रम झाला नव्हता. हा कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल मी राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. वर्ल्डकपची फायनल मॅच झाली, त्यावेळी 30 बॉलमध्ये 30 रन्स पाहिजे होते. तेव्हा अनेक क्रीडा रसिकांनी आशा सोडली होती. पण कोठेतरी असं वाटतं होतं. काहीतरी चमत्कार घडेल. तो चमत्कार घडला. प्रत्येक खेळाडूने अतिशय उत्तम प्रकारचा खेळ दाखवला.
सूर्यकुमार यादवनं जे काम केलं त्यावेळी कपिल देव यांनी केलं होतं
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, 1983 ला वर्ल्ड कप जिंकला होता. आता सूर्यकुमार यादवनं जे काम केलं त्यावेळी कपिल देव यांनी केलं होतं. यशस्वी जयस्वाल नवखा आहे, शिवम दुबे ज्यावेळी भाषणाला उठला त्यावेळी भाषण करायला सांगू नका असं म्हटला. मी फक्त त्याला जय हिंद जय महाराष्ट्र असं म्हणायला सांगितलं, असं अजित पवार म्हणाले. रोहित शर्मा आता टी 20 क्रिकेट खेळणार नाही पण पुढच्या काळात भारतीयांना तुझी आठवण येईल, असं अजित पवार यांनी म्हटलं.
View this post on Instagram
इतर महतवाच्या बातम्या