एक्स्प्लोर

Ajinkya Rahane SMAT 2024 : हार्दिक पांड्याच्या संघावर भारी पडली मुंबई! थेट फायनलमध्ये मारली एन्ट्री, अजिंक्य रहाणेचे हुकले शतक

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टूर्नामेंट 2024 च्या पहिल्या उपांत्य फेरीत बडोद्याचा सामना मुंबईशी झाला.

Baroda vs Mumbai Semi Final-1 Syed Mushtaq Ali Trophy 2024 : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी टूर्नामेंट 2024 च्या पहिल्या उपांत्य फेरीत बडोद्याचा सामना मुंबईशी झाला. ज्यामध्ये अजिंक्य रहाणेची तुफानी खेळी आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर मुंबई संघाने हा सामना जिंकून अंतिम फेरीत धडक मारली. रहाणेला त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले. सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत जाणारा दुसरा संघ कोण असेल, यावरून अद्याप पडदा उठलेला नाही.  

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना बडोदा संघाला मोठी धावसंख्या करता आली नाही. शिवालिक शर्माने संघाकडून सर्वाधिक धावा केल्या, तो 36 धावांवर नाबाद परतला. संघाने केवळ 158 धावा केल्या. कर्णधार कृणाल पंड्याने 30 धावा केल्या, तर हार्दिक पंड्या केवळ 5 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मुंबईकडे पाठलाग करण्यासाठी मोठी धावसंख्या नव्हती, पण पृथ्वी शॉच्या रूपाने त्याची पहिली विकेटही लवकर पडली. त्याला केवळ 8 धावा करता आल्या. मात्र, दुसऱ्या टोकाला अजिंक्य रहाणेने तूफानी फटकेबाजी सुरू ठेवली.

अजिंक्य रहाणे 98 धावा झाला आऊट

मुंबईच्या या विजयाचा सर्वात मोठा हिरो ठरला अजिंक्य रहाणे. त्याला आपले शतक पूर्ण करता आले नसेल, तरी आपल्या संघाला विजयाच्या दारात घेऊन गेल्यानंतर तो बाद झाला. त्याने 56 चेंडूत 98 धावांची तुफानी खेळी खेळली. या काळात त्याच्या बॅटमधून 11 चौकार आणि तीन षटकार आले. संघाला विजयासाठी दहा धावा करायच्या होत्या तेव्हा रहाणे 90 धावांवर खेळत होता. त्याने दोन चौकार मारून आपली धावसंख्या 98 वर नेली. आता संघाला विजयासाठी दोन धावांची गरज होती आणि रहाणेला त्याच्या शतकासाठी तेवढ्याच धावा हव्या होत्या. दरम्यान अभिमन्यू सिंगने वाईड बॉल टाकला.

अजिंक्य रहाणेला शतकासाठी दोन धावांची गरज होती, पण मुंबईला विजयासाठी एका धावेची गरज होती. म्हणजे रहाणेने चौकार किंवा षटकार मारला असता तरच त्याचे शतक पूर्ण झाले असते. रहाणेने हाच प्रयत्न केला. पण चेंडू तो बाद झाला. यानंतर सूर्यकुमार यादवही त्याच धावसंख्येवर बाद झाला. त्याने सात चेंडूत एक धाव घेतली. विजयासाठी केवळ एका धावेची गरज असली तरी त्यामुळे मुंबईला फारशी अडचण आली नाही आणि संघाने हा सामना 6 गडी राखून जिंकला.

हे ही वाचा -

Ind vs Aus 3rd Test : गाबा कसोटीत रोहित शर्मा गंभीरच्या लाडक्याचा करणार गेम? टीम इंडियाच्या प्लेइंग-11मध्ये 'या' खेळाडूची थेट एन्ट्री

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनच्या बाॅडीगार्डला सुद्धा हैदराबाद पोलिसांनी उचलले; वकील तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयात!
अल्लू अर्जुनच्या बाॅडीगार्डला सुद्धा हैदराबाद पोलिसांनी उचलले; वकील तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयात!
Ajit Pawar & Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गट पुन्हा एकत्र आले पाहिजेत; रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य
तिकडे दिल्लीत गुप्त बैठक अन् इकडे रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य, पुन्हा 'अखंड' राष्ट्रवादीची साद
देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा, जळगावात पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये संघर्ष?
देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा, जळगावात पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये संघर्ष?
Nana Patole: मला पदातून मुक्त करा, नाना पटोलेंचं दिल्लीत पत्र; विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय
मला पदातून मुक्त करा, नाना पटोलेंचं दिल्लीत पत्र; विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lok Sabha Parliament Session  : राज्यघटनेवर संसदेत चर्चा, Rajnath Singh  यांचं भाषणRajya Sabha Parliament : राज्यसभेत अविश्वास प्रस्तावावरून गदारोळ,खरगेंच्या पोस्टवरून गदारोळSunanda Pawar On Sharad Pawar :दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं; सुनंदा पवार यांचं वक्तव्य #abpमाझाAllu Arjun Arrested:पायात चप्पलही नाही, हाफ पँटवरच अल्लू अर्जुन पोलिसांच्या ताब्यात, EXCLUSIVE VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनच्या बाॅडीगार्डला सुद्धा हैदराबाद पोलिसांनी उचलले; वकील तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयात!
अल्लू अर्जुनच्या बाॅडीगार्डला सुद्धा हैदराबाद पोलिसांनी उचलले; वकील तत्काळ सुनावणीसाठी न्यायालयात!
Ajit Pawar & Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गट पुन्हा एकत्र आले पाहिजेत; रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य
तिकडे दिल्लीत गुप्त बैठक अन् इकडे रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य, पुन्हा 'अखंड' राष्ट्रवादीची साद
देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा, जळगावात पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये संघर्ष?
देवकरांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार, त्यांना सोडणार नाही; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा, जळगावात पुन्हा दोन गुलाबरावांमध्ये संघर्ष?
Nana Patole: मला पदातून मुक्त करा, नाना पटोलेंचं दिल्लीत पत्र; विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय
मला पदातून मुक्त करा, नाना पटोलेंचं दिल्लीत पत्र; विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय
डाव्या हातावर चावलेल्या सापाला उजव्या हातात घेऊन सर्पमित्र दुचाकीवरुन थेट रुग्णालयात
डाव्या हातावर चावलेल्या सापाला उजव्या हातात घेऊन सर्पमित्र दुचाकीवरुन थेट रुग्णालयात
Uddhav Thackeray : बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होतायत, विश्वगुरु शांत का? उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर घणाघात, म्हणाले, हे फक्त फोडाफोडीचे राजकारण...
बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होतायत, विश्वगुरु शांत का? उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर घणाघात, म्हणाले, हे फक्त फोडाफोडीचे राजकारण...
Asaduddin Owaisi on Hindus in Bangladesh : असदुद्दीन ओवेसींनी बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला, परराष्ट्र मंत्री जयशंकर काय म्हणाले?
असदुद्दीन ओवेसींनी बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला; परराष्ट्र मंत्री जयशंकर काय म्हणाले?
Sarpanch Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला शोधा, कारवाईत दिरंगाई केली तर सोडणार नाही; बजरंग सोनवणेंचा पोलिसांना दम
सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला शोधा, कारवाईत दिरंगाई केली तर सोडणार नाही; बजरंग सोनवणेंचा पोलिसांना दम
Embed widget