Ind vs Aus 3rd Test : गाबा कसोटीत रोहित शर्मा गंभीरच्या लाडक्याचा करणार गेम? टीम इंडियाच्या प्लेइंग-11मध्ये 'या' खेळाडूची थेट एन्ट्री
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना 14 डिसेंबरपासून गाबाच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवला जाणार आहे.
India vs Australia 3rd Gabba Test Playing xi : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना 14 डिसेंबरपासून गाबाच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवला जाणार आहे. त्यासाठी दोन्ही संघांनी तयारी पूर्ण केली आहे. ऑस्ट्रेलियाने तर सामन्याच्या एक दिवस अगोदर आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. मात्र, टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा खुलासा अद्याप झालेला नाही. शनिवारी सामना सुरू होईल तेव्हाच रोहित शर्मा नाणेफेकीच्या वेळी त्याची प्लेइंग इलेव्हन उघड करेल, असे मानले जाते. दरम्यान, पुढील सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल होऊ शकतात.
टीम इंडियाच्या गोलंदाजीत होणार बदल
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया शेवटचा सामना गमावल्यानंतर येथे पोहोचत आहे. त्यामुळे संघ काहीसा दडपणाखाली असणार आहे. पण भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना जिंकला आहे, त्यामुळे भारताला अजूनही मालिका जिंकण्याची संधी आहे. पण भारताच्या फलंदाजीत काही बदल होण्याची शक्यता फारच कमी आहे. फक्त क्रमवारीत निश्चितपणे बदल होऊ शकतात.
3️⃣ Groups
— BCCI (@BCCI) December 13, 2024
1️⃣8️⃣ Maximum Balls
6️⃣ Targets 🎯
Who takes the win? 🤔
Watch 🎥 #TeamIndia's fun & creative fielding drill with Fielding Coach T Dilip ahead of the Gabba Test 👌👌#AUSvIND
हर्षित राणाचा होणार पत्ता कट...
नुकतेच पदार्पण करणारा आणि गेल्या सामन्यात एकही विकेट घेऊ न शकलेल्या गोलंदाज हर्षित राणाला पुढील सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. सामन्याच्या पहिल्या डावात त्याला विकेट मिळाली मिळाली नाही. अशा स्थितीत तो प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर पडणार हे निश्चित मानले जात आहे. आता त्यांच्या जागी कोण येणार हा प्रश्न आहे.
मात्र, त्याची जागा दोन वेगवान गोलंदाज घेऊ शकतात. आकाश दीप, मुकेश कुमार आणि प्रसिद्ध कृष्णा या पैकी एकाला संघात संधी मिळू शकतो. प्रसिद्ध कृष्णाची उंची चांगली आहे आणि चेंडू गाब्बामध्ये चांगला उसळतो, याचा फायदा प्रसिद्धला मिळू शकतो. टीम इंडियाच्या सराव सत्रात मुकेश कुमारने बरीच गोलंदाजी केली आहे, ज्यामुळे तो प्लेईंग इलेव्हनमध्येही स्थान मिळवू शकेल अशी अपेक्षा आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणाची पुष्टी सामन्याच्या सकाळी नाणेफेक झाल्यावरच होईल.
रोहित शर्माबाबत पुन्हा सस्पेन्स
दरम्यान, रोहित शर्मा पुन्हा एकदा मधल्या फळीत खेळणार की सलामीला येणार याबाबत सस्पेंस आहे. या मालिकेच्या पहिल्या कसोटीत यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुलची जोडी हिट ठरली असली तरी दुसऱ्या सामन्यात ही जोडी काही अप्रतिम कामगिरी करू शकली नाही. अशा परिस्थितीत रोहित शर्मा आपल्या फलंदाजीच्या क्रमाबाबत काय निर्णय घेतो, असे प्रश्न नक्कीच आहेत. एकाच सामन्यातील अपयशानंतर सलामीची जोडी फोडणे हे योग्य नाही, पण रोहित शर्माला मधल्या फळीत धावा काढता येत नसल्याचंही टेन्शन आहे. गेल्या सामन्यात तो प्रत्येक धावांसाठी संघर्ष करताना दिसला. असे अनेक प्रश्न आहेत, पण त्यांची उत्तरे 14 डिसेंबरला होणाऱ्या सामन्यापूर्वी कळतील.