Ajay Jadeja : अजय जडेजा यांच्या दिलदारपणाची गोष्ट अखेर समोर, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सीईओंनी सांगितलं गुपित
Ajay Jadeja: टीम इंडियाचा माजी खेळाडू अजय जडेजानं 2023 वनडे वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानच्या टीमचे मेंटॉर म्हणून काम केलं होतं.
नवी दिल्ली: भारतात झालेल्या 2023 च्या वन डे वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) माजी दिग्गज खेळाडू अजय जडेजा (Aajay Jadeja) यांनी अफगाणिस्तानच्या (Afghanistan ) टीमचे मेंटॉर म्हणून काम केलं होतं. अफगाणिस्ताननं त्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड, पाकिस्तान सारख्या बड्या संघांना पराभूत केलं होतं. तेव्हा अजय जडेजा यांना अफगाणिस्ताच्या संघाला मार्गदर्शन करण्यासाठी मोठी रक्कम मिळाल्याच्या चर्चा त्यावेळी झाल्या होत्या. मात्र, नव्या माहितीनुसार अजय जडेजा यांनी अफगाणिस्तानच्या क्रिकेट बोर्डाकडून एक रुपया देखील फी म्हणून घेतलेला नाही.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओंनी अरैना न्यूज सोबत चर्चा करताना याबद्दल भाष्य केलं आहे. अजय जडेजा यांनी 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्ताला जे मार्गदर्शन केलं, त्यासाठी बोर्डाकडून देऊ केलेली रक्कम घेण्यास नकार दिला. त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही चांगलं क्रिकेट खेळा तेच माझ्यासाठी बक्षीस आणि पैशासारखं असेल, असं अजय जडेजा म्हणाल्याचं अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सीईओंनी सांगितलं.
अजय जडेजा 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानचे मेंटॉर आणि सहायक कोच होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अफगाणिस्ताननं गतविजेत्या इंग्लंड आणि पाकिस्तानला पराभूत करत खळबळ उडवली होती. त्यावेळी जगभरात अफगाणिस्तानच्या यशाचं श्रेय अजय जडेजा यांना दिलं जात होतं. न का क्रेडिट अजय जडेजा को दे रहे थे.
अजय जडेजा यांची कारकीर्द
अजय जडेजा यांनी भारताच्या टीममध्ये 1992 मध्ये पदार्पण केलं होतं. भारताकडून त्यांनी 15 कसोटी आणि 196 एकदिवसीय सामने खेळले. कसोटीत त्यांनी 576 धावा केल्या. तर, वनडे म्ध्ये 5359 धावा केल्या होत्या. अजय जडेजा यांना त्यावेळी वनडे क्रिकेटचे स्पेशालिस्ट मानलं जात होतं. एकदिवसीय सामन्यात त्यांनी सहा शतकं आणि 30 अर्धशतकं केली आहेत. 1996 मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान वनडे वर्ल्ड कपमध्ये त्यांनी 25 बॉलमध्ये 45 धावांची खेळी केली होती. त्यामुळं पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागला होता.
दरम्यान, अफगाणिस्तानच्या संघानं टी20 वर्ल्ड कपमध्ये सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे. अफगाणिस्तान सुपर 8 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध खेळणार आहे. अफगाणिस्तानच्या संघानं यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये मोठी मजल मारली आहे.
संबंधित बातम्या :
मोठी बातमी : न्यूझीलंडचं विश्वचषकातील आव्हान संपलं, अफगाणिस्तानचा सुपर 8 मध्ये दणक्यात प्रवेश!