Raina on Pushpa Dance: डेव्हिड वॉर्नरपाठोपाठ सुरेश रैनाही थिरकला श्रीवल्ली गाण्यावर, इन्स्टाग्रामवर शेअर केला व्हिडीओ
Raina on Pushpa Dance: पुष्पा सिनेमातील सुपस्टार अल्लू अर्जूनच्या (Allu Arjun) श्रीवल्ली गाण्यावर डान्स करतानाचे व्हिडीओ अनेकजण तयार करत असून हे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट देखील करत आहेत.
Raina on Pushpa Dance: दाक्षिणात्य सिनेमा पुष्पा द राईज (Pushpa) यंदाच्या सध्या सिनेमागृहानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवरही हवा करत आहे. सिनेमातील सुपस्टार अल्लू अर्जूनची (Allu Arjun) नकल अनेकजण करत असून त्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत. सिनेमातील श्रीवल्ली गाणं तर प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलंय. श्रीवल्ली गाण्यानं लोकांची मनं जिंकली असून अनेक जण या गाण्यातील अल्लू अर्जूनच्या डान्सप्रमाणे डान्स करत त्याचे व्हिडीओ पोस्ट करत आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरनंतर आता भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाही या गाण्यावर थिरकला आहे.
सुरेश रैनाने श्रीवल्ली गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ त्याच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ त्याने त्याच्या घरातच शूट केल्याचं दिसून येत आहे. दरम्यान त्याच्या या पोस्टवर अनेक क्रिकेटपटूंनी प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे ज्याच्यावर हे गाणं चित्रित झालं आहे तो अभिनेता अल्लू अर्जून याने स्वत: देखील रैनाच्या या पोस्टवर ग्रेट अशी कमेंट केली आहे. ज्याला रैनाने रिप्लाय देत 'तु भारी काम केलं आहेस मी देखील तुझा मोठा चाहता आहे.' असा रिप्लाय केला आहे.
सुरेश रैनाची इन्स्टाग्राम पोस्ट
हे देखील वाचा-
- Ind vs SA, 3rd ODI: चित्तथरारक सामन्यात भारत चार धावांनी पराभूत, एकदिवसीय मालिका 3-0 ने गमावली
- ICC T20I Player of Year: पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानचं मोठं यश, आयसीसी टी20 प्लेयर ऑफ द इयर म्हणून जाहीर
- IPL 2022 : आयपीएल 2022 चा थरार भारतातच ; BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांची माहिती
- ICC Emerging Men's Cricketer 2021: दक्षिण आफ्रिकेचा जानेमन मलान ठरला यंदाचा आयसीसी 'इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha