(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ICC Emerging Men's Cricketer 2021: दक्षिण आफ्रिकेचा जानेमन मलान ठरला यंदाचा आयसीसी 'इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर'
ICC Emerging Men's Cricketer 2021: मलाननं मागील वर्षात आंतरराष्ट्रीय सामन्यात 47.66 च्या सरासरीनं आणि 101.85 च्या स्ट्राईक रेटनं 715 धावा केल्या आहेत. यात दोन शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.
ICC Emerging Men's Cricketer 2021: आयसीसी म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदनं 2022 मधील इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द ईयरच्या खेळाडूच्या नावाची घोषणा केलीय. दक्षिण आफ्रिकेच्या युवा सलामीवीर जानेमन मलान या पुरस्कारासाठी निवडण्यात आलंय. मलाननं मागील वर्षात आंतरराष्ट्रीय सामन्यात 47.66 च्या सरासरीनं आणि 101.85 च्या स्ट्राईक रेटनं 715 धावा केल्या आहेत. यात दोन शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.
मलाननं गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं पहिला टी-20 सामना पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. त्यानंतर मायदेशात पाकिस्तानविरुद्ध खेळण्यात आलेल्या मर्यादीत षटकाच्या क्रिकेटमध्ये त्यानं सेन्चुरियनमध्ये 70 आणि 55 धावांची दोन उत्कृष्ट इनिंग खेळल्या होत्या. त्यानंतर डबलिन येथे आयर्लंड विरुद्ध त्यानं नाबाद 177 धावांची इनिंग खेळली. ज्यात 16 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. ज्यामुळं चर्चेत आला. त्यावेळी एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक स्कोर करणारा मलान चौथा खेळाडू ठरला. त्यानंतर त्यानं कोलंबोत श्रीलंकाविरुद्ध 121 धावांची आणखी एक दमदार खेळी केली.
भारताविरुद्ध 92 धावांची खेळी
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेत जानेमन मलाननं उत्कृष्ट फलंदाजी केली होती. पर्ल येथे खेळण्यात आलेल्या या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मलाननं 92 धावांची खेळी केली होती.
आयसीसी पुरस्कार
दरम्यान, पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवाननं (Mohammad Rizwan) आयसीसी टी20 प्लेयर ऑफ इयर (ICC T20 Player Of Year) पुरस्कार मिळवला असून पाकिस्तानची महिला क्रिकेटपटू फातिमा सना (Fatima Sana) हीला 'आयसीसी इमर्जिंग वूमन क्रिकेटर 2021' ने सन्मानित करण्यात आलं आहे.
- ICC T20I Player of Year: पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानचं मोठं यश, आयसीसी टी20 प्लेयर ऑफ द इयर म्हणून जाहीर
- IND Vs SA, 3rd ODI LIVE: भारत- दक्षिण आफ्रिकादरम्यान तिसरा सामना, प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर
- IPL 2022 : आयपीएल 2022 चा थरार भारतातच ; BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांची माहिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha