AFG vs NZ : "वॉशरुमच्या पाण्याने बनवलं जेवण... BCCI झोपलय का?", स्टेडियमविरोधात का घेत नाही ॲक्शन; जाणून घ्या Inside स्टोरी
सध्या सोशल मीडियावर ग्रेटर नोएडा स्टेडियम चर्चेचा विषय बनला आहे.
Afghanistan vs New Zealand Test : सध्या सोशल मीडियावर ग्रेटर नोएडा स्टेडियम चर्चेचा विषय बनला आहे. जेथे अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या एकमेव कसोटी सामन्याला दोन दिवस झाले आहेत, पण अद्याप नाणेफेक झाले नाही. खरंतर, जिथे सुरुवातीपासूनच व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसामुळे नाणेफेक झाली नाही आणि मैदान ओले होते, तर दुसऱ्या दिवशी परिस्थिती आणखीनच बिकट होती.
Day 2 of the #AFGvNZ Test has been called off with no play taking place. pic.twitter.com/iglUQ8o0WD
— ICC (@ICC) September 10, 2024
तुम्हाला आश्चर्य वाटेल की, 8 सप्टेंबरला पाऊस झाला, त्यानंतर 9 सप्टेंबरला फक्त हलका पाऊस होता. पण, येथील ड्रेनेज व्यवस्था इतकी खराब आहे की, ग्राउंड स्टाफने पंखाचा वापर केला, परंतु ते मैदान कोरडे करू शकले नाहीत. दरम्यान, खाण्याची भांडी वॉशरूममध्ये धुतल्याचे आढळून आल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली. आणि तिथूनच स्वयंपाक करण्यासाठी भांड्यात पाणीही भरले. त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, याबाबत बीसीसीआयकडून कोणतीही प्रतिक्रिया का देण्यात आलेली नाही, असे चाहते विचारत आहे. पण त्यामागे एक मोठी स्टोरी आहे ते जाणून घेऊया....
Ok so catering here at Greater Noida stadium is using urinal washroom
— Nitin K Srivastav (@Nitin_sachin) September 10, 2024
Water tap for their water needs 😯
very hygienic 👍#AFGvNZ TEST #afgvsnz test #gnoidastadium pic.twitter.com/VCWVA5r2vv
बीसीसीआय स्टेडियमविरोधात का घेत नाही ॲक्शन?
अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना ग्रेटर नोएडा येथील ग्रेटर नोएडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मैदानावर खेळला जाणार आहे. पण, ओल्या आउटफिल्डमुळे दुसऱ्या दिवशी सामना सुरू होऊ शकला नाही, त्यामुळे चाहते सोशल मीडियावर बीसीसीआयला दोष देत आहेत.
पण, 2013 मध्ये बांधलेले ग्रेटर नोएडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मैदान बीसीसीआयच्या अंतर्गत येत नाही. उलट, हे एक खाजगी स्टेडियम आहे, जे उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन अंतर्गत येते. अशा स्थितीत त्याच्या देखभालीची जबाबदारीही उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनवर येते. त्यामुळे बीसीसीआय स्टेडियमविरोधात कोणती पण ॲक्शन घेऊ शकत नाही.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांची पहिली पसंती लखनऊच्या एकना स्टेडियमला होती. परंतु सध्या त्या स्टेडियममध्ये आधीपासूनच बुकिंग होते. त्यामुळे त्यांना ग्रेटर नोएडाची निवड करावी लागली. बोर्डाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, "येथे कोणतीही गोष्टची सुविधा नाही. सरावाच्या सुविधांच्या अभावामुळे अफगाणिस्तानचे खेळाडू थोडे घाबरले आहेत. आम्ही येथे परत येणार नाही.
हे ही वाचा -
वॉशरूमच्या पाण्यापासून बनवलं जेवण? जगभरात BCCIची नाचक्की, AGF vs NZ मॅच दुसऱ्या दिवशीही रद्द