वॉशरूमच्या पाण्यापासून बनवलं जेवण? जगभरात BCCIची नाचक्की, AGF vs NZ मॅच दुसऱ्या दिवशीही रद्द
NZ vs AFG Test Greater Noida Stadium : बीसीसीआयसारख्या श्रीमंत मंडळाच्या स्टेडियमची अशी अवस्था कशी होऊ शकते, असा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात येत आहे.
Afghanistan vs New Zealand One-off Test Greater Noida Stadium : ग्रेटर नोएडा स्टेडियममध्ये न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील कसोटी सामना खेळवला जाणार होता. पण पहिल्या दिवसाचा खेळ ओल्या खेळपट्टीमुळे वाया गेला आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ पण रद्द करण्यात आला आहे. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे मैदानाची दुरवस्था झाली असून, नोएडा स्टेडियममध्ये जागतिक दर्जाच्या सुविधांना देखील नाहीत. त्यामुळे बीसीसीआयसारख्या श्रीमंत मंडळाच्या स्टेडियमची अशी अवस्था कशी होऊ शकते, असा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात येत आहे. दरम्यान आता जेवणाच्या सुविधांवरही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. एका नवीन फोटो समोर आला आहे, ज्यात असे दिसते की स्वयंपाक करण्यासाठी वॉशरूममधून भांड्यात पाणी भरले जात आहे.
एकीकडे, अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यासाठी संपूर्ण ग्राउंड स्टाफ मैदानातील पाणी काढण्यात व्यस्त आहे. स्टेडियम कोरडे पडणे ही ग्राऊंड स्टाफसाठी मोठी समस्या असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे, आता जेवण करणारा वॉशरुमच्या वॉश-बेसिनमध्ये भांडी धुताना दिसला, आणि तिथून स्वयंपाक करण्यासाठी भांड्यात पाणीही भरले.
India's betrayal of Afghanistan cricket is shocking! Greater Noida Stadium isn't even fit for street cricket.
— Conflict Watch (@ConflictWatchX) September 10, 2024
Groundsmen patching grass from practice areas, and catering using urinal washroom taps for water! How can they treat a Test team like this? #AFGvNZ #ShameOnIndia https://t.co/qXD8pRDM4W pic.twitter.com/Se3SyENhI9
"आम्हाला पुन्हा इथे येणार नाही..."
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) यापूर्वीच मैदानाच्या सुविधांबाबत आक्षेप घेतला आहे. स्पोर्ट्स तकच्या म्हणण्यानुसार, एसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "येथे सुविधा नावाची कोणतीही गोष्ट नाही. आम्हाला पुन्हा इथे यायला आवडणार नाही. त्याऐवजी आम्ही लखनौच्या मैदानाला प्राधान्य देऊ." या एसीबी अधिकाऱ्याने मैदानात सामान्य सुविधाही उपलब्ध नसल्याचे सांगितले. येथे व्यवस्थापन नावाची गोष्ट नाही आणि खेळाडूही सुविधांबाबत खूश नाहीत.
अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामना सलग दुसऱ्या दिवशी रद्द
गेल्या 10 दिवसांपासून उत्तर भारतात सतत पाऊस पडत आहे. अशा परिस्थितीत ग्रेटर नोएडाच्या मैदानावर पण पाणी होते. मैदान ओले असल्याने पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. नाणेफेकही झाली नाही. दुसऱ्या दिवसाच्या आदल्या रात्री पुन्हा मुसळधार पाऊस पडला, पण मैदानावरील कर्मचारी दुसऱ्या दिवशीही खेळपट्टी आणि मैदान कोरडे करू शकले नाहीत. या कारणास्तव दुसरा दिवसही रद्द घोषित करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, आतापर्यंत या सामन्याचा नाणेफेकही झालेला नाही.
हे ही वाचा -