एक्स्प्लोर

Abu Dhabi T10 League: अबु धाबी टी10 लीगला नोव्हेंबरमध्ये होणार सुरुवात, टूर्नामेंटसंबधी सर्व माहिती एका क्लिकवर

Abu Dhabi T10 League: अबु धाबी टी10 लीगला 23 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहेत. या लीगचा अंतिम सामना 4 डिसेंबररोजी खेळवला जाणार आहे.

Abu Dhabi T10 : अबु धाबी T10 स्पर्धेचा (Abu Dhabi T10 League) सहावा हंगाम 23 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. झायेद क्रिकेट स्टेडियमवर सामने खेळवले जाणार असून स्पर्धेतील सर्व फ्रँचायझींनी त्यांचे संघ जवळपास जाहीर केले आहेत. न्यू यॉर्क स्ट्रायकर्स आणि मॉरिसविले एसएएमपी आर्मीसह दोन नवीन फ्रँचायझी या स्पर्धेत जोडल्या गेल्या आहेत. अबुधाबी टी10 लीग 23 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचा अंतिम सामना 4 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे.

दरम्यान संघनिवडीदरम्यान टी10 स्पोर्ट्स मॅनेजमेंटचे अध्यक्ष शाजी उल मुल्क म्हणाले, "या अबू धाबी T10 लीगसाठीची ही खेळाडूंची निवड पार पडली याचा मला आनंद झाला आहे. मला खात्री आहे की हा हंगाम मागील वर्षांपेक्षा अधिक रोमांचक असेल."

गतविजेत्या डेक्कन ग्लॅडिएटर्सने आंद्रे रस्सेल, मुजीब उर रहमान, डेव्हिड विसे, टॉम कोहलर-कॅडमोर, ल्यूक वुड, ओडियन स्मिथ, जोश लिटिल, विल स्मीड, झहीर खान, कर्टिस कॅम्पर, झहूर खान, आदिल मलिक, सुलतान अहमद आणि जेसन रॉय यांना संघात सामिल करुन घेतलं आहे.

बांग्ला टायगर्समध्ये शाकिब अल हसन आयकॉन प्लेअर असून त्याच्यासोबत एविन लुईस, कॉलिन मुनरो, हजरतुल्ला झाझाई, जो क्लार्क, बेनी हॉवेल, बेन कटिंग, मोहम्मद अमीर, मथिशा पाथिराना, नुरुल हसन, मृत्युंजय चौधरी, रोहन मुस्तफा, चिराग सुरी, उमेर अली डॅन ख्रिश्चन आणि जेक बॉल यांचा समावेश आहे.

आयकॉन खेळाडू म्हणून ड्वेन ब्राव्होसह, दिल्ली बुल्सने टीम डेव्हिड, रिले रोसो, रहमानउल्ला गुरबाज, फझलहक फारुकी, विल जॅक, डॉमिनिक ड्रेक्स, नजीबुल्लाह झद्रान, रिचर्ड ग्लीसन, कीमो पॉल, मिचेल स्टॅनले, शिराज अहमद, कर्नल जाहिद यांना सामिल केलं आहे. तसंच अयान खान, इमाद वसीम आणि जॉर्डन कॉक्ससारखे खेळाडूही संघात आहेत.

नुकताच आशिया चषक श्रीलंकेला जिंकवून दिलेल्या दासून शनाकाच्या नेतृत्त्वाखाली चेन्नई ब्रेव्ह्स संघात कार्लोस ब्रॅथवेट, भानुका राजपक्षे, ओबेद मॅककॉय, महेश थेक्षना, ऑली स्टोन, बेन डकेट, सॅम कुक, सिकंदर रझा, रॉस व्हाइटली, कोबे हफर्ट, कार्तिक मयप्पन, साबीर राव, लॉरी इव्हान्स आणि जेम्स फुलर हे खेळाडू आहेत.

स्पर्धेत दोन वेळा चषक जिंकणाऱ्या नॉर्दर्न वॉरियर्सने श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा, शेरफेन रुदरफोर्ड, रोव्हमन पॉवेल, अॅडम लेथ, रीस टोपले, केनर लुईस, वेन पारनेल, अॅडम हॉज, ख्रिस ग्रीन, रियाड एम्रिट, गस ऍटकिन्सन, जुनैद सिद्दीकी या खेळाडूंना संघात कायम ठेवलं आहे.  हमदान ताहिर, दुष्मंथा चमिरा आणि मोहम्मद इरफान या नव्या खेळाडूंना संघात सामिल केलं आहे.

टीम अबु धाबीमध्ये फॅबियन एलन, आदिल राशिद, फिल साल्ट, नवीन उल हक, टाइमल मिल्स, जेमी ओवरटन, जेम्स विंस, ब्रँडन किंग, दरविश रसूली, अलीशान शराफू, अमद बट, अली आबिद, एथन डिसूजा, मुस्तफिजुर रहमान आणि पीटर हटजोग्लू हे खेळाडू आहेत.

न्यूयॉर्क स्ट्रायकर्समध्ये कायरन पोलार्ड आयकॉन खेळाडू असून इयॉन मॉर्गन, आजम खान, पॉल स्टर्लिंग, रोमारियो शेफर्ड, आंद्रे फ्लेचर, वहाब रियाज, जॉर्डन थॉम्पसन, केसरिक विलियम्स, इजहारुलहक नवीद, टॉम हार्टले, मुहम्मद वसीम, नव पबरेजा, मुहम्मद फारूक, रवी रामपॉल, अकील होसिनसारखे खेळाडू सामिल आहेत.

लांस क्लूजनर संघात डेव्हिड मिलर आयकॉन खेळाडू आहे. त्याच्यासह एनरिक नॉर्खिया, शिमरोन हेटमायर, मोईन अली, ड्वेन प्रिटोरियस, जॉनसन चार्ल्स, चमिका करुणारत्ने, जॉर्ज गार्टन, एंड्रीज गॉस, अब्राहम पिएनार, इब्राहिम जादरान, अहमद रजा, काशिफ दाउद, बासिल हमीद, शेल्डन कॉटरेल आणि करीम जनत यांनाही संघात घेतलं आहे.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Doctors : फक्त 2MM ने वाचला ⁠सैफ अली खान! हल्ल्याबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4 PM 17 January 2025Dhananjay Deshmukh : ...म्हणून मी आज जबाब नोंदवणार नाही, धनंजय देशमुखांनी स्वतः सांगितलं कारणMaharashtra Superfast | राज्यातील बातम्यांच्या सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर | Superfast News | 17 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
Khel Ratna And Arjuna Awards : मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
Ahilyanagar Crime :  नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
Fact Check: भाजप नेत्यांकडून आपच्या अवध ओझांचा सिसोदियांना 'घाबरट' म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल, दावा ठरला खोटा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
आपचे नेते अवध ओझांनी मनीष सिसोदियांना घाबरट म्हटल्याच्या दावा खोटा, एडिटेड व्हिडीओ व्हायरल
Embed widget