Virat Kohli : विराटच नाही तर गावस्कर, सर विवीयन रिचर्डस, दिलशानसह बऱ्याच दिग्गजांची शतकासाठी मोठी प्रतिक्षा, पाहा आकडेवारी
Virat Kohli Century : आशिया कपमध्ये अफगाणिस्तान संघाविरुद्ध विराट कोहलीने तब्बल 1021 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर शतक ठोकलं.
Virat Kohli : विराट कोहलीने (Virat Kohli) आशिया कपमध्ये (Asia Cup) 8 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 71 वं शतक झळकावलं. त्याने अफगाणिस्तानविरुद्ध 53 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या. विशेष म्हणजे 1021 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर विराटच्या बॅटमधून हे शतक आलं आहे. त्याच्या दोन शतकांमध्ये असणाऱ्या या अंतरामुळे अनेकांनी त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली. मात्र, आजवरच्या क्रिकेट इतिहासातील दिग्गज खेळाडूंच्या आकडेवारीवर नजर टाकली असता दोन शतकांमधील मोठ्या अंतराच्या बाबतीत सुनीव गावस्कर, मॅथ्य हेडन, दिलशान, स्टीव्ह वॉ, युवराज सिंह, एमएस धोनी, रोहित शर्मा असे जवळपास 34 दिग्गज सामिल आहेत, ज्यांनी विराटपेक्षा जास्त अंतर घेऊन शतक ठोकलं आहे.
'या' पाच दिग्गज खेळाडूंच्या शतकाचं अंतर 2000 दिवसांहून अधिक
भारताचा माजी क्रिकेटर मनोज प्रभाकर याच्या दोन शतकांमधील अंतर 2775 दिवस इतकं आहे. दोन शतकांमध्ये सर्वाधिक अंतर घेणाऱ्यांच्या यादीत तो एक नंबरला आहे. त्याच्यानंतर इंग्लंडचा दिग्गज खेळाडू माइक गेटिंगनेही दोन शतकं ठोकण्यासाठी 2730 दिवसांचं अंतर घेतलं आहे. श्रीलंकेचा अर्जुन रणतुंगा (2340 दिवस), भारताचा युवराज सिंह (2132 दिवस) आणि पाकिस्तानचा शोएब मलिक (2068 दिवस) यांचाही टॉप 5 मध्ये समावेश आहे.
सुनील गावस्करसह रोहित शर्मासारखे दिग्गज भारतीयांची यादी
भारताकडून 11 असे फलंदाज आहेत, ज्यांनी दोन शतक ठोकण्यासाठी विराट कोहलीपेक्षा जास्त वेळ घेतला आहे. मनोज प्रभाकर आणि युवराज सिंहनंतर सुरेश रैना (1493 दिवस), मोहिंदर अमरनाथ (1407 दिवस), रोहित शर्मा (1235 दिवस), अंबाती रायडू (1207 दिवस), एमएस धोनी (1188 दिवस), कपिल देव (1188 दिवस), सुनील गावस्कर (1150 दिवस), मोहम्मद कैफ (1084 दिवस), मोहम्मद अजहरुद्दीन (1023 दिवस) यांची नावं या यादीत आहेत.
परदेशी दिग्गज क्रिकेटरही सामिल
माइक गेटिंग, अर्जुन रणतुंगा आणि शोएब मलिकनंतर या यादीत 23 दिग्गज खेळाडू आहेत, ज्यांनी दोन शतकं ठोकण्यासाठी विराटपेक्षा अधिक वेळ घेतला आहे. यामध्ये पाकिस्तानचा इलियाज अहमद (1713 दिवस), पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी (1606 दिवस), वेस्ट इंडीजचा क्लाइव लॉयड (1582 दिवस), ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन (1494 दिवस), श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान (1475 दिवस), दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाउचर (1468 दिवस), ऑस्ट्रेलियाचा एलन बॉर्डर (1446 दिवस), ऑस्ट्रेलियाचा के डेरेन लेहमन (1348 दिवस), न्यूझीलंडचा एस. फ्लेमिंग (1283 दिवस) सारख्या दिग्गजांचा समावेश आहे.
तसंच दक्षिण आफ्रिकेचा हँसी क्रोन्ये (1237 दिवस), इंग्लंडचा ग्राहम गूच (1235 दिवस), इंग्लंडचा के जी बॉयकॉट (1216 दिवस), वेस्ट इंडीजचा शिवनारायण चंद्रपॉल (1173 दिवस), इंग्लंडचा माइक एथरटन (1168 दिवस), न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल (1143 दिवस), ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह वॉ (1113 दिवस), न्यूझीलंडचा ब्रँडन मॅक्क्युलम (1059 दिवस), वेस्टइंडीजचा कार्ल हूपर (1049 दिवस), वेस्ट इंडीजचा डेसमंड हँस (1043 दिवस) आणि विवियन रिचर्ड्स (1031 दिवस) या दिग्गजांची नावंही सामिल आहेत.
हे देखील वाचा-