एक्स्प्लोर

Aaditya Thackeray : प्रत्येक अंतिम सामना अहमदाबादलाच का? मुंबईत का नाही? ICC ने राजकारण करू नये; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

T20 World Cup 2026 Timetable : मुंबईसोबत कोलकाता, चेन्नई आणि मोहाली यासारखी स्टेडियम असताना प्रत्येक महत्त्वाचा सामना अहमदाबादला नेण्याचा अट्टहास का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला.

T20 World Cup 2026 : आगामी T20 विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा झाली असून या स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे ठिकाणही निश्चित करण्यात आले आहे. अंतिम सामना 8 मार्च रोजी, अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. आता यावरूनच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी टीका केली आहे. प्रत्येक महत्त्वाचा सामना अहमदाबादलाच का? मुंबईला ऐतिहासिक पार्श्वभूमी असताना तिथे का अंतिम सामना खेळवला जात नाही? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला.

आगामी टी 20 विश्वचषकाचा एक उपांत्य सामना हा मुंबईला तर दुसरा उपांत्य सामना हा कोलकाता किंवा श्रीलंकेतील कोलंबो येथे खेळवण्यात येणार आहे. तर अंतिम सामना हा अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणार आहे. या आधी एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामनाही अहमदाबादमध्ये खेळवण्यात आला होता.

T20 World Cup 2026 Final Match : मुंबई का नाही?

आदित्य ठाकरे यांनी एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आयसीसीला काही प्रश्न विचारले आहेत. ते म्हणाले की, प्रत्येक अंतिम सामना हा अहमदाबादमध्ये खेळवला जात आहे. क्रिकेटची अशी कोणती पार्श्वभूमी त्या शहराला आहे? मुंबईत अंतिम सामना का खेळवण्यात आला नाही?

आयसीसीने (ICC) राजकारण किंवा पक्षपातीपणापासून दूर राहावे, अशी अपेक्षा आहे. ईडन गार्डन्सकोलकाता, एम.ए. चिदंबरम स्टेडियमचेन्नई, आय.एस. बिंद्रामोहाली ही सर्व मैदानं टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी योग्य आहेत. पण यामध्ये राजकारण केलं जात असल्याने आपल्यावर अन्याय होतो अशी भावना आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

T20 World Cup 2026 Timetable : विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा

आयसीसीच्या आगामी ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या वेळापत्रकाची मुंबईत घोषणा करण्यात आली. हा विश्वचषक 7 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत भारत आणि श्रीलंकेत खेळवण्यात येत आहे. या विश्वचषकाचा अंतिम सामना 8 मार्चला अहमदाबादमध्ये खेळवण्यात येईल.

या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान संघांचा समावेश एकाच गटात करण्यात आला आहे. उभय संघांमधला सामना 15 फेब्रुवारीला कोलंबोत खेळवण्यात येईल. या विश्वचषकाच्या अ गटात भारत आणि पाकिस्तानसह अमेरिका, नेदरलँड्स आणि नामिबिया संघांचा समावेश आहे.

T20 World Cup 2026 Full Schedule : विश्वचषकाचे गट कोणते?

गट अ: भारत, पाकिस्तान, यूएसए, नेदरलॅंड्स, नामिबिया

गट ब: ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, आयर्लंड, ओमान

गट क: इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश, नेपाळ, इटली

गट ड: दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, कॅनडा, यूएई

T20 World Cup 2026 India Matches : भारताचे सामने कधी?

15 फेब्रुवारी भारत विरुद्ध पाकिस्तान

7 फेब्रुवारी भारत विरुद्ध अमेरिका (मुंबई वानखेडे)

12 फेब्रुवारी भारत विरुद्ध नामिबिया (नवी दिल्ली)

18 फेब्रुवारी भारत विरुद्ध नेदरलँड्स (अहमदाबाद)

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Australia : बांगलादेशकडून झालेला पराभव जिव्हारी लागला, ऑस्ट्रेलियानं सलामीवीराला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर 
ऑस्ट्रेलियानं सलामीवीर बदलला, अपयशी खेळाडूला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
IND vs SL 1st Test DAY-4 : चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?
चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget