एक्स्प्लोर

Commonwealth Games 2022 : महाराष्ट्रातील कॉमनवेल्थ पदक विजेत्यांवर लाखोंचा वर्षाव, शासनाकडून बक्षिसाच्या रकमेत मोठी वाढ

CWG 2022 : कॉमनवेल्थ 2022 मध्ये भारत चौथ्या स्थानी राहिला असून भारताने एकूण 61 पदकांवर यंदा नाव कोरलं. यामध्ये 22 सुवर्णपदकं, 16 रौप्यपदकांसह 23 कांस्यपदकांचा समावेश होता. यावेळी महाराष्ट्राच्या 7 खेळाडूंनी विजयी कामगिरी केली.

Commonwealth Games 2022 : इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये राष्ट्रकुल स्पर्धा अर्थात कॉमनवेल्थ स्पर्धा (Commonwealth Games 2022) पार पडली. भारताने यंदा 61 पदकांवर यंदा नाव कोरत चौथं स्थान मिळवलं. यावेळी हरयाणा आणि पंजाबच्या सर्वाधिक खेळाडूंनी पदकांना गवसणी घातली असती तरी महाराष्ट्राच्या 14 खेळाडूंनी सहभाग घेतला असून 7 जणांनी पदकाला गवसणी घातली. दरम्यान या खेळाडूंना महाराष्ट्र सरकारने आधी जाहीर केलेल्या रकमेत मोठी वाढ केली आहे. यावेळी सुवर्णपदकविजेत्यांना 12 लाख 50 हजारांचं बक्षिस जाहीर करण्यात आलं होतं, हे आता थेट 50 लाख करण्यात आलं आहे. रौप्य आणि कांस्य पदक विजेत्यांची बक्षिसाची रक्कमही वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्राचे क्रीडामंत्री गिरीष महाजन यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

यंदा कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील 14 खेळाडू सहभागी झाले होते. यावेळी 7 खेळाडूंनी पदकांना गवसणी घातली. दरम्यान विजयी खेळाडूंना केंद्र सरकार 30 लाख तर महाराष्ट्र सरकारने 12 लाख 50 हजार रुपये देण्याचं जाहीर केलं होतं. दरम्यान सुवर्णपदक विजेत्यांची बक्षिसाची रक्कम 12.50 लाखांवरुन 50 लाख केली आहे. तर रौप्य पदक विजेत्यांना 7 लाखांहून 30 लाख देण्याचं जाहीर केलं आहे. याशिवाय कांस्य पदक विजेत्यांना 5 लाखांहून आता 20 लाख दिले जाणार आहेत. याशिवाय प्रशिक्षकांना देखील तीन लाखाच्या जागी 12 लाख देण्यात येणार आहेत.  

खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणार

राज्याचे क्रीडामंत्री गिरीष महाजन यांनी बक्षिसाची रक्कम वाढवताना खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे शाळेत शारिरीक शिक्षणाच्या अर्थात पीटीच्या तासाची सक्ती देखील केली जाणार आहे. तसंच पीटी शिक्षकांची भरती ही बंद केली होती, त्यावरही निर्णय घेतला जाणार आहे. 

राज्यनिहाय पदकांची टॅली

राज्यनिहाय पदकांचा विचार करता सर्वाधिक म्हणजेच 24 पदकं हरयाणाच्या खेळाडूंनी मिळवली. तर 18 पदकं पंजाबला मिळाली. यानंतर दिल्ली आणि झारखंड यांनी प्रत्येकी 8 तर महाराष्ट्राने 7 तर तेलंगना 6 आणि केरळ-तामिळनाडूने अनुक्रमे 5 आणि 4 पदक मिळवली. तसंच गुजरातने 4 तर चंदीगड, मणिपूर आणि उत्तराखंडने प्रत्येकी 3 विकेट्स मिळवले, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मिझोरम आणि ओडिसा यांनी प्रत्येकी दोन पदकं जिंकली. तर मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि हैद्रबादमधील खेळाडूंनी प्रत्येकी एक पदक जिंकलं.

भारतासाठी पदक जिंकलेल्या खेळाडूंची यादी

सुवर्णपदक- 22
मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश फोगट, नवीन, भाविना पटेल, नीतू घणघस, अमित पंघाल, एल्डहॉस पॉल, निकहत जरीन, शरथ-श्रीजा, पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन, बॅडमिंटन पुरुष दुहेरी संघ, शरथ कमाल

रौप्यपदक- 15
संकेत सरगर, बिंद्याराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक, प्रियंका गोस्वामी, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल संघ, अब्दुल्ला अबोबकर, शरथ-साथियान, महिला क्रिकेट संघ, सागर, पुरुष हॉकी संघ.

कांस्यपदक- 23
गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरदीप सिंह, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जास्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोकस, महिला हॉकी संघ , संदीप कुमार, अन्नू राणी, सौरव-दीपिका, किदम्बी श्रीकांत, त्रिशा-गायत्री, साथियान गनसेकरन

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Omkar Tarmale : बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
Pradnya Satav: प्रज्ञा सातव आमदारकीसह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार, सभापतींकडे मागितली वेळ, भाजप प्रवेश निश्चित!
प्रज्ञा सातव आमदारकीसह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार, सभापतींकडे मागितली वेळ, भाजप प्रवेश निश्चित!

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Omkar Tarmale : बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
बापाने कर्ज काढून क्रिकेट शिकवलं, पोराने पांग फेडले, महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारनच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
Pradnya Satav: प्रज्ञा सातव आमदारकीसह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार, सभापतींकडे मागितली वेळ, भाजप प्रवेश निश्चित!
प्रज्ञा सातव आमदारकीसह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार, सभापतींकडे मागितली वेळ, भाजप प्रवेश निश्चित!
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Dhurandhar Hit Or Flop On Box Office: अक्षय खन्नाचा 'धुरंधर' हिट की फ्लॉप? बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे काय सांगतात?
अक्षय खन्नाचा 'धुरंधर' हिट की फ्लॉप? बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे काय सांगतात?
Manikrao Kokate Resignation: अटक वॉरंट निघण्याची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
अटक वॉरंटची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
Embed widget