एक्स्प्लोर

India CWG 2022 Medal Tally : 22 सुवर्णपदकं, 16 रौप्यपदकांसह 23 कांस्यपदकं, कशी होती भारतासाठी कॉमनवेल्थ 2022?

Commonwealth Games 2022 : 1930 पासून पार पडणाऱ्या या स्पर्धेत भारताने मागील काही वर्षात अगदी चमकदार कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं आहे.

CWG 2022 : इंग्लंडच्या बर्मिंगहममध्ये कॉमनवेल्थ स्पर्धा (Commonwealth Games 2022) नुकतीच पार पडली. स्पर्धेच्या अखेरीस भारत चौथ्या स्थानी राहिला असून भारताने एकूण 61 पदकांवर यंदा नाव कोरलं. यामध्ये 22 सुवर्णपदकं, 16 रौप्यपदकांसह 23 कांस्यपदकांचा समावेश होता. यंदा स्पर्धेत काही नव्या चेहऱ्यांसह दिग्गज खेळाडूंनीही चमकदार कामगिरी केली... पण भारत सर्वात यशस्वी ठरलेली शूटींग स्पर्धा यंदा कॉमनवेल्थमध्ये नसल्याने भारताच्या पदकतालिकेवर मोठा फरक पडला. पण याऊलटही भारताने दमदार कामगिरी करत चौथं स्थान मिळवलं. तर नेमकी भारतासाठी कॉमनवेल्थ स्पर्धा 2022 कशी होती यावर एक नजर फिरवूया...
 
जागतिक स्तरावरील एक महत्त्वाचा मल्टी स्पोर्ट्स इव्हेंट म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धा ज्याला इंग्रंजीत कॉमनवेल्थ गेम्स असं म्हटलं जातं.1930 पासून पार पडणाऱ्या या स्पर्धेत भारताने मागील काही वर्षात अगदी चमकदार कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं आहे. 2010 साली तर 101 पदकांसह भारताने दुसरं स्थान पटकावलं होतं. यंदा 61 पदकं जिंकत भारत चौथ्या स्थानी राहिला. शूटींग स्पर्धा नसल्याने यंदा भारताने सर्वाधिक पदकं कुस्तीमध्ये जिंकली. वेटलिफ्टिंगमध्ये भारताची कामगिरी उल्लेखणीय होती

भारताची कॉमनवेल्थ 2022 मधील कामगिरी!

India CWG 2022 Medal Tally : 22 सुवर्णपदकं, 16 रौप्यपदकांसह 23 कांस्यपदकं, कशी होती भारतासाठी कॉमनवेल्थ 2022?

सर्वाधिक पदकं कुस्तीत

यंदा भारताच्या कॉमनवेल्थ स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्वच्या सर्व कुस्तीपटूंनी पदकाला गवसणी घातली. त्यामुळे भारताने सर्वाधिक पदकं यंदा कुस्ती खेळात मिळवली. यामध्ये 6 सुवर्णपदकांसह 1 रौप्य आणि 5 कांस्य पदकांचा समावेश आहे. यात बजरंग पुनिया, दीपक पुनिया, रवी दहिया, नवीन यांच्यासह महिलांमध्ये विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांनी सुवर्णपदक मिळवलं. तर अंशू मलिकने रौप्यपदक मिळवलं. तर मोहित ग्रेवाल, दीपक नेहरा, पुजा गेहलोट, पुजा सिहाग आणि दिव्या काकरन यांनी कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं.

वेटलिफ्टिंगमध्येही भारताचा दबदबा

भारताने यंदा मिळवलेल्या पदकांचा विचार करता कुस्तीनंतर सर्वाधिक पदकं ही वेटलिफ्टिंग खेळात मिळवली. भारताने 3 गोल्ड, 3 सिल्वर आणि 4 कांस्यपदकांसह एकूण 10 पदकं वेटलिफ्टिंगमध्ये मिळवली.  विशेष म्हणजे स्पर्धेतील सर्वात पहिलं पदक मीराबाई चानूने सुवर्णपदकाच्या रुपात वेटलिफ्टिंगमध्ये मिळवून दिलं. मीराबाईसह जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली यांनीही गोल्ड जिंकलं. याशिवाय संकेत सरगर, बिंद्याराणी देवी, विकास ठाकूर यांनी रौप्य पदक मिळवलं.तर गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह यांनी कांस्यपदक मिळवलं. 

अॅथलेटिक्समध्ये 8 पदकं

भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा यंदा दुखापतीमुळे स्पर्धेला मुकल्याने भारताचं एक जवळपास निश्चित असणारं गोल्ड हुकलं. पण तरी अॅथलेटिक्समध्ये भारताने 8 पदकं जिंकली. यामध्ये एका सुवर्णपदकासह 4 रौप्य आणि 3 कांस्यपदकांचा समावेश होता. विशेष म्हणजे ट्रीपल जम्पमध्ये भारताने गोल्ड आणि सिल्वर दोन्ही मिळवले. याल एलडॉस पॉल आणि अब्दुला अबुबकर यांनी अनुक्रमे ही पदकं जिंकली. तर स्टीपलचेसमध्ये अविनाश साबळे आणि 10 किमी चालण्याच्या शर्यतीत प्रियांका गोस्वामी यांनी रौप्य पदकं मिळवली. तर 10 किमी चालण्याच्या शर्यतीत कांस्यपदक संदीप कुमारने मिळवलं. याशिवाय हाय जम्पमध्ये एम श्रीशंकर, तेजस्वीन शंकर यांनी आणि भालाफेकमध्ये  अन्नू राणी हिने कांस्य पदक जिंकलं.

बॉक्सिंगमध्ये भारताला सात पदकं

बॉक्सिंग स्पर्धेतही भारताने दमदार कामगिरी करत सात पदकांना गवसणी घातली. यामध्ये निखत झरीन, नितू घांघससह अमित पांघलने सुवर्णपदक तर सागर अहलवाटने रौप्य आणि रोहित टोकस, जॅस्मिन आणि मोहम्मद हुसामुद्दीन यांनी कांस्य पदक मिळवलं.

टेबल टेनिसमध्ये 4 सुवर्णपदकं

टेबल टेनिस आणि पॅरा टेबल टेनिसमध्ये मिळून भारताने तब्बल 4 सुवर्णपदकं, 1 रौप्य आणि 2 कांस्य पदकं जिंकली. यामध्ये शरथ कमल-श्रीजा जोडीने तसंच शरथने पुरुष एकेरीत आणि पुरुष संघाने गोल्ड मिळवलं. पॅरा टेबल टेनिसपटू भाविनानेही गोल्ड तर सोनलबेनने कांस्यपदक मिळवलं. तर शरथ आणि साथियान यांच्या जोडीने रौप्य आणि साथियान गनसेकरनने पुरुष एकेरीत कांस्य पदक मिळवलं.

बॅडमिंटनमध्येही भारत यशस्वी

बॅडमिंटनस्पर्धेत भारताने तीन सुवर्णपदकांसह दोन कांस्य आणि एक रौप्यपदक जिंकत 6 पदकं मिळवली. यामध्ये पुरुष, महिला एकेरीत अनुक्रमे लक्ष्य सेन आणि पीव्ही सिंधूने तर सात्विक आणि चिराग जोडीने पुरुष दुहेरीत गोल्ड मिळवलं. तर बॅडमिंटन संघाने रौप्यपदकाला गवसणी घातली. त्रिसा जॉली आणि गायत्री गोपिचंद यांनी महिला दुहेरीत आणि किदम्बी श्रीकांतने पुरुष एकेरीत कांस्य पदक मिळवलं.

क्रिकेट-हॉकीमध्येही पदक

यंदा नव्याने सामिल करण्यात आलेल्या महिला क्रिकेट स्पर्धेत भारताला फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागल्याने रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. पुरुष हॉकी संघालाही कांगारुनीच मात दिल्यामुळे रौप्य पदक मिळाल. तर महिला हॉकी संघाने कांस्य पदकावर नाव कोरलं.

लॉन बॉल्स हा अनेकांना अपरिचित असणाऱ्या खेळातही भारताने अप्रतिम कामगिरी करत महिला गटात गोल्ड तर पुरुष गटात सिल्वर मेडल मिळवलं. त्याशिवाय ज्युदोमध्ये सुशीला देवी आणि तुलिका मान यांनी रौप्य तर विजय कुमारनं कांस्य पदक जिंकलं.  तसचं पॅरा वेटलिफ्टर सुधीरने सुवर्णपदक जिकलं. तसंच स्कॉश खेळात भारताच्या सौरव घोषालने कांस्य पदक आणि मिश्र फेरीत सौरवने दिपीकासह कांस्यपदक मिळवलं. 

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget