बॉक्सिंगमध्ये भारताचे पाच पदकं निश्चित; अमित-जॅस्मीनच्या जोडीने उपांत्य फेरीत मारली धडक
Commonwealth Games 2022: बर्मिंगमध्ये कॉमनवेल्थ स्पर्धेचा (Commonwealth Games 2022) 22 वा हंगाम सुरु आहे. यात भारतीय बॉक्सर्सची चमकदार कामगिरी सुरू आहे.
Commonwealth Games 2022: बर्मिंगमध्ये कॉमनवेल्थ स्पर्धेचा (Commonwealth Games 2022) 22 वा हंगाम सुरु आहे. यात भारतीय बॉक्सर्सची चमकदार कामगिरी सुरू आहे. अमित पंघल आणि जॅस्मीन लांबोरिया यांनी चमकदार कामगिरी करत उपांत्य फेरीत प्रवेश करून बॉक्सिंगमध्ये भारताचे पाच पदके निश्चित केले आहेत. अमितने गुरुवारी पुरुषांच्या 51 किलो फ्लायवेट प्रकारात स्कॉटलंडच्या लेनन मुलिगनचा 5-0 असा पराभव केला. तर दुसरीकडे जॅस्मीन लांबोरियाने 60 किलो वजनी गटात न्यूझीलंडच्या ट्रॉय गार्टेनचा 4-1 असा पराभव केला.
पहिली फेरी सोडल्यास अमितने प्रत्येक फेरीत प्रतिस्पर्ध्यावर आपले वर्चस्व गाजवले. याआधी अमितने राऊंड-16 मध्येही सामना 5-0 असा जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. तत्पूर्वी वर्ल्ड चॅम्पियन निकहत झरीन, नीतू घंघस आणि हुसामुद्दीन मोहम्मद यांनीही उपांत्य फेरी गाठून आपले पदक पक्के केले आहेत.
आतापर्यंत इतक्या पदकांची केली कमाई
कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताला आतापर्यंत 18 पदके मिळाली आहेत. ज्यात पाच सुवर्ण, सहा रौप्य आणि सात कांस्य पदकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे वेटलिफ्टिंगमध्ये भारताने दहा पदकांची कमाई केली आहे. त्याचबरोबर ज्युदोमध्ये भारताला तीन तर लॉन बॉल्स, टेबल टेनिस, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स आणि स्क्वॉशमध्ये एक पदक मिळाले आहे.
कॉमनवेल्थ स्पर्धेतील भारतातील पदक विजेते
1. संकेत महादेव - रौप्य पदक (वेटलिफ्टिंग 55 किलो)
2. गुरुराजा- कांस्य पदक (वेटलिफ्टिंग 61 किलो)
3. मीराबाई चानू - सुवर्णपदक (वेटलिफ्टिंग 49 किलो)
4. बिंदियारानी देवी - रौप्य पदक (वेटलिफ्टिंग 55 किलो)
5. जेरेमी लालरिनुंगा - सुवर्ण पदक (67 किलो वजन उचलणे)
6. अचिंता शेउली - सुवर्णपदक (73 KG वेटलिफ्टिंग)
7. सुशीला देवी - रौप्य पदक (जुडो 48 किलो)
8. विजय कुमार यादव – कांस्य पदक (जुडो 60 किलो)
9. हरजिंदर कौर- कांस्य पदक (वेटलिफ्टिंग 71KG)
10. महिला संघ - सुवर्णपदक (लॉन बॉल्स)
11. पुरुष संघ - सुवर्णपदक (टेबल टेनिस)
12. विकास ठाकूर - रौप्य पदक (वेटलिफ्टिंग 96 किलो)
13. मिश्र संघ - रौप्य पदक (बॅडमिंटन)
14. लवप्रीत सिंग – कांस्य पदक (वेटलिफ्टिंग 109 किलो)
15. सौरव घोषाल – कांस्य पदक (स्क्वॉश)
16. तुलिका मान - रौप्य पदक (ज्युदो)
17. गुरदीप सिंग – कांस्य पदक (वेटलिफ्टिंग 109+ केजी)
18. तेजस्वीन शंकर – कांस्य पदक (उंच उडी)