Divya Kakran Wins bronze : कुस्तीपटूंनी पाडला पदकांचा पाऊस, एका दिवसात जिंकली पाच पदकं, दिव्याच्या खिशात कांस्यपदक
Commonwealth Games 2022 : आज भारताचे कुस्तीपटू कॉमनवेल्थ गेम्समध्ये तुफान फॉर्ममध्ये दिसत आहेत. पाच कुस्तीपटूंनी आज पदकावर नाव कोरलं आहे.
Wrestling in Commonwealth 2022 : इंग्लंडच्या बर्मिगहममध्ये सुरु कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताच्या कुस्तीपटूंनी एकाच दिवसात पाच पदकं खिशात घातली आहेत. यात नुकतंच भारताने महिलांच्या 68 किलोग्राम वजनी गटात दिव्या काकरनच्या मदतीने कांस्य पदक मिळवलं आहे. आधीच्या सामन्यात पराभूत झालेल्या दिव्याने तिसऱ्या स्थानासाठीचा सामना जिंकत कांस्य मिळवलं आहे. तिने टोंगाच्या टायगर लिली कॉकर लेमाली हिला मात देत पदक जिंकलं आहे.
भारताची महिला कुस्तीपटू दिव्या काकरानने स्पर्धेत सुरुवातीचे सामने जिंकले खरे पण आधी तिला पराभव पत्करावा लागला, ज्यामुळे तिचं सुवर्ण तसंच रौप्य पदकाचं स्वप्न भंगलं. पण कांस्य पदकासाठीच्या सामन्यात मात्र दिव्याने उत्कृष्ट खेळ दाखवला. तिनेने केवळ अर्ध्या मिनिटात विरोधी कुस्तीपटूला चीटपट केलं आणि कांस्यपदकावर नाव कोरलं आहे.
DIVYA WINS 🥉 IN 26sec 🤯🤩@DivyaWrestler (W-68kg) wins her 2nd consecutive medal at #CommonwealthGames 🥉🥉 before India 🇮🇳 could even blink 😋😍
— SAI Media (@Media_SAI) August 5, 2022
VICTORY BY FALL for Divya 🙇♀️🙇♂️
She takes India's medal tally in wrestling to 5️⃣ 🏅at @birminghamcg22
Congrats 💐💐#Cheer4India pic.twitter.com/UWZ2D4MutC
भारताचं कुस्तीतील पाचवं पदक
आज भारताचे कुस्तीपटू कॉमनवेल्थमध्ये अक्षरश: पदकांचा पाऊस पाडत आहे. अंशूने रौैप्य तर बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकने सुवर्णपदक मिळवल्यानंतर कुस्तीपटू दीपक पुनियानेही सुवर्णपदकाला गवसणी घातली. ज्यानंतर सेमीफायनलमध्ये पराभूत दिव्या काकरनने कांस्य पदक मिळवलं आहे. ज्यामुळे भारताची पदकसंख्या 25 वर गेली आहे.
हे देखील वाचा-