एक्स्प्लोर
Advertisement
सर्वाधिक षटकारांचा विक्रम, गेलची शाहिद आफ्रिदीशी बरोबरी
बांगलादेशविरुद्ध झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात पाच षटकार खेचत गेलने आफ्रिदीच्या विक्रमाशी बरोबरी केली. गेलने या सामन्यात 66 चेंडूंत 73 धावांची खेळी केली.
मुंबई : वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या शाहिद आफ्रिदीच्या विक्रमाशी बरोबरी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता ख्रिस गेल आणि शाहिद आफ्रिदीच्या नावावर प्रत्येकी 476 षटकारांची नोंद आहे.
बांगलादेशविरुद्ध झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात पाच षटकार खेचत गेलने आफ्रिदीच्या विक्रमाशी बरोबरी केली. गेलने या सामन्यात 66 चेंडूंत 73 धावांची खेळी केली. गेलच्या या खेळीनंतरही वेस्ट इंडिजचा संघ या सामन्यात पराभूत झाला.
ख्रिस गेलने आपल्या 443 व्या सामन्यात या विक्रमाला गवसणी घातली. दुसरीकडे, शाहिद आफ्रिदीने 524 सामन्यांत हा विक्रम केला होता. आफ्रिदीने वनडेमध्ये 351 षटकार, टी-ट्वेण्टीत 73 तर कसोटी सामन्यांत 52 षटकार ठोकले आहेत. तर गेलच्या नावावर वनडेत 275, टी-ट्वेण्टीत 103 तर कसोटीमध्ये 98 षटकारांची नोंद आहे.
मायदेशात 100 पेक्षा जास्त षटकार खेचणाऱ्यांच्या यादीतही गेल आता चौथा फलंदाज ठरला आहे. या यादीत न्यूझीलंडचा ब्रँडन मॅक्युलम 126 षटकारांसह अव्वल स्थानी आहे.
दरम्यान, बांगलादेशविरुद्ध 1 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या टी-ट्वेण्टी मालिकेत ख्रिस गेलला अजून एक षटकार खेचून शाहिद आफ्रिदीला मागे टाकण्याची संधी आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement