एक्स्प्लोर

AFC Women's Asian Cup: चीन पीआरनं कोरिया रिपब्लिकला नमवत मिळवलं जेतेपद

AFC Women's Asian Cup: दोन गोलची पिछाडी भरून काढत 2-0 ने चायना पीआर संघाने एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. येथील डी वाय पाटील मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी कोरिया रिपब्लिकचा ३-२ गोलने पराभव केला. 

AFC Women's Asian Cup: चीन पीआर संघाने (China PR) एएफसी वुमन्स आशिया कप भारत, 2022 स्पर्धेच्या (AFC Women's Asian Cup) अंतिम सामन्यात कोरिया रिपब्लिकला (Korea Republic) 3-2 ने मात देत स्पर्धेचं जेतेपद मिळवलं आहे. त्यांनी याआधीच स्पर्धेतील अप्रतिम कामगिरीमुळे 2023 च्या फिफा महिला विश्वचषक स्पर्धेत थेट स्थानही मिळवलं होतं. त्यामुळे त्याठिकाणीही त्यांच्याकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सामन्यात चीन पीआरने दोन गोलची पिछाडी भरून काढत कोरिया रिपब्लिक संघाला 3-2 ने मात दिली. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील मैदानावर हा अंतिम सामना पार पडला. या अटीतटीच्या सामन्यात मध्यंतरादरम्यानतर कोरिया रिपब्लिकने 2-0 ची आघाडी घेतली होती. पण, उत्तरार्धात चीन पीआर संघाने कमालीचा आक्रमक खेळ करत बाजी पलटवली. टँग जिआली, झँग लिनयान आणि झिआओ युयी यांनी तीन गोल करून संघाच्या नवव्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. कोरियाला पुन्हा एकदा करंडकाशिवाय परतावे लागले. 

असा पार पडला सामना

सामना सुरू झाल्यापासून दोन्ही संघानी अटीतटीचा खेळ सुरु केला. पण चीन पीआर संघाची आक्रमणं कोरियाच्या गोलकिपरने परतावून लावली. कोरिया रिपब्लिक संघाने पूर्वाधार्चा अर्धा वेळ संपल्यावर खेळावर नियंत्रण राखायला सुरवात केली. सामन्याच्या 27 व्या मिनिटाला मिळालेली पहिलीच संधी त्यांनी सार्थकी लावली. ली जेऊम मिन हिने बचाव भेदून चीन पीआरच्या गोलकक्षात धडक मारली. तिने संधी साधून चोए यु री हिच्याकडे पास दिला आणि तिने गोल करत कोरिया रिपब्लिकला 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मध्यंतरापूर्वी आणखी एक पेनल्टीची संधी कोरियाला मिळाली. जी सो युन हिने गोल करत संघाला 2-0 ची आघाडी मिळवून दिली. पण त्यानंतर चीन पीआर संघाचे प्राशिक्षक शुई क्वींगझिया यांनी झिआओ युई आणि झँग रुई यांना उत्तरार्धाच्या सुरवातीपासून मैदानात उतरवले. त्यांचा हा निर्णय अचूक ठरला. या दोघींच्या खेळाने चायना पीआर संघाला पुन्हा सामन्यात आणले. 68 व्या मिनिटाला चीन पीआर संघाला पेनल्टी मिळाली. टँग हिने ही संधी साधून संघाचा पहिला गोल केला. त्यानंतर पुन्हा एकदा टँगने कोरिया रिपब्लिकच्या दोन बचावपटूंना चकवून मुसंडी मारली आणि गोलपोस्टच्या जवळ सहा यार्डावर असणाऱ्या झँग लिनयान हिच्याकडे सुरेख पास दिला. तिनेही ही संधी दवडली नाही आणि चेंडूला जाळीची दिशा देत बरोबरी साधली. त्यानंतर वँग शानशान हिच्या सहाय्याने वँग युई हिने सामन्यात शेवटची काही मिनिटं शिल्लक असताना अखेरचा गोल केला. गोलसह चीन पीआरने 3-2 ने सामना जिंकला.

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Dhruv Jurel Catch IND vs NZ 1st Test : बिबट्यासारखी झेप, ध्रुव जुरेलची अफलातून कॅच; शुभमन गिल ओरडत सुटला, अंगावर पडला, न्यूझीलंडची दुसरी विकेट पडताच काय घडलं?
बिबट्यासारखी झेप, ध्रुव जुरेलची अफलातून कॅच; शुभमन गिल ओरडत सुटला, अंगावर पडला, न्यूझीलंडची दुसरी विकेट पडताच काय घडलं?
IND vs PAK Playing XI : अभिषेक शर्मा-वैभव सूर्यवंशी सलामीवीर, तर कुमार कुशाग्र... पाकिस्तानविरुद्ध अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
अभिषेक शर्मा-वैभव सूर्यवंशी सलामीवीर, तर कुमार कुशाग्र... पाकिस्तानविरुद्ध अशी असेल टीम इंडियाची धडकी भरवणारी Playing XI
IND vs NZ 1st Test : जसप्रीत बुमराह बनला टॉम लॅथमचा कर्दनकाळ! पहिल्याच षटकात पुन्हा काटा काढला, दुसऱ्या डावातील दुसऱ्या चेंडूवर नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
जसप्रीत बुमराह बनला टॉम लॅथमचा कर्दनकाळ! पहिल्याच षटकात पुन्हा काटा काढला, दुसऱ्या डावातील दुसऱ्या चेंडूवर नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Rishabh Pant IND vs NZ 1st Test : ऋषभ पंत नावाचं वादळ अन् न्यूझीलंड हादरलं! चेंडू थेट स्टेडियमबाहेर भिरकावला, रस्त्यावर जाऊन पडला; गोलंदाज पाहतच राहिला, अंपायरही अवाक्, पाहा VIDEO
ऋषभ पंत नावाचं वादळ अन् न्यूझीलंड हादरलं! चेंडू थेट स्टेडियमबाहेर भिरकावला, रस्त्यावर जाऊन पडला; गोलंदाज पाहतच राहिला, अंपायरही अवाक्, पाहा VIDEO

व्हिडीओ

Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule Pawar Family Accident In Rajasthan News: उभ्या ट्रकला क्रूझर धडकली, धुळ्यातील पवार कुटुंबातील 9 जणांनी जागीच जीव सोडला; 8 जण जखमी, अख्खं घर सुन्न
उभ्या ट्रकला क्रूझर धडकली, धुळ्यातील पवार कुटुंबातील 9 जणांनी जागीच जीव सोडला; 8 जण जखमी, अख्खं घर सुन्न
Nashik Crime News: आरटीओ अधिकाऱ्यानं संपवलं जीवन; पत्नीनं पोलिसांकडे केली तक्रार, ती शेवटची तारीख ठरेल म्हणून धमकी अन्...; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
आरटीओ अधिकाऱ्यानं संपवलं जीवन; पत्नीनं पोलिसांकडे केली तक्रार, ती शेवटची तारीख ठरेल म्हणून धमकी अन्...; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Tamhini Ghat: दोन दिवसांपासून बेपत्ता; लोकेशन दिसलं ताम्हिणी घाट, रायगडच्या उद्योजकाचा 1200 फूट खोलदरीत अपघात, नेमकं काय घडलं?
दोन दिवसांपासून बेपत्ता; लोकेशन दिसलं ताम्हिणी घाट, रायगडच्या उद्योजकाचा 1200 फूट खोलदरीत अपघात, नेमकं काय घडलं?
Pune Swargate Bus Depo Crime : स्वारगेटमध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार; सुनावणीवेळी कोर्टामध्ये पीडिता ढसाढसा रडली, नेमकं काय घडलं?
स्वारगेटमध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार; सुनावणीवेळी कोर्टामध्ये पीडिता ढसाढसा रडली, नेमकं काय घडलं?
Accident News: राजस्थानमध्ये भीषण अपघात, महाराष्ट्रातील 9 जणांचा जागीच मृत्यू, 8 जण गंभीर जखमी; गाडी चक्काचूर, मदत करणाऱ्यांचे पायही थरथर कापले
राजस्थानमध्ये भीषण अपघात, महाराष्ट्रातील 9 जणांचा जागीच मृत्यू, 8 जण गंभीर जखमी; गाडी चक्काचूर, मदत करणाऱ्यांचे पायही थरथर कापले
Nagpur Air Fest 2026 Air Show : सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?
सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?
Narendra Modi On Gold Rate: सोन्याचे भाव धडाधड घसरले; आता नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
सोन्याचे भाव धडाधड घसरले; आता नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Ramrao Wadkute Passes Away: दुःखद बातमी! राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
दुःखद बातमी! राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
Embed widget