Pro Chess League : भारताच्या खेळाडूची भन्नाट कामगिरी, पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनला नमवलं!
Pro Chess League : 'इंडियन योगीज'कडून खेळताना विदित गुजराती याने वर्ल्ड चॅम्पियन कार्लसनच्या चुकीचा पुरेपूर फायदा घेतला.
Pro Chess League : भारतीय ग्रँडमास्टर विदित गुजराती (Vidit Gujrathi) याने प्रो शतरंज लीग स्पर्धेतील सामन्यात वर्ल्ड सॅम्पियन मॅग्नस कार्लसन (Magnus Carlsen) याचा पराभव करत मोठा उलटफेर केला आहे. नार्वेच्या मॅग्नस कार्लसन याला भारताच्या बुद्धीबळपटूकडून पराभवाचा सामना करावा लागला. कार्लसन याच्यावर विदित गुजराती याचा पहिला विजय आहे. 'इंडियन योगीज'कडून खेळताना विदित गुजराती याने वर्ल्ड चॅम्पियन कार्लसन याच्या चुकीचा पुरेपूर फायदा घेतला. कार्लसन याचा पराभव हा स्पर्धेतील सर्वात मोठा उलटफेर म्हटले जातेय.
मॅग्नस कार्लसन 'कनाडा चेसब्रास'कडून 'प्रो शतरंज लीग' मध्ये खेळत आहे. या स्पर्धेकडे जगभरातील बुद्धीपळ चाहत्यांचं लक्ष होतं. ऑनलाईन स्पर्धेत 16 संघांनी भाग घेतला आहे. त्यांच्यामध्ये रॅपिड गेम सुरु आहे. 28 वर्षीय विदित गुजराती याने कार्लसनचा पराभव करत मोठा विजय मिळवला आहे. या विजयानंतर गुजराती क्रीडा जगतात चर्चेचा विषय आहे. दरम्यान, याआधी भारताचा प्रतिभावंत बुद्धीबळपटू प्रज्ञानानंद याने कार्लसनचा पराभव केला होता.
'प्रो शतरंज लीग' मध्ये गुजरातीने पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन(GrandMaster Magnus Carlsen) कार्लसनचा पराभव केला. विजयानंतर गुजराती म्हणाला की, बुद्धीबळातील सर्वकालीन खेळाडूला हरवणं माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. माझ्या आयुष्यातील हा सर्वोत्तम क्षण आहे, याला कधीच विसरु शकत नाही. मॅग्नस कार्लसन याचा पराभव करत विदित गुजराती भारतीय ग्रँडमास्टर (Indian GrandMaster) आर प्रज्ञानानंद, डी गुकेश आणि अर्जुन एरिगेसी यांच्या रांगेत स्थान मिळवलं आहे. गुजरातीआधी या तिन्ही खेळाडूंनी 2022 मध्ये वेगवेगळ्या स्पर्धेत कार्लसनचा पराभव केला आहे.
प्रो शतरंज लीग स्पर्धेतील सामन्यात गुजरातीच्या नेतृत्वातील भारतीय संघात (Indian Yogis) वैशाली, रौनक आणि अरोनयाक यांचा समावेश आहे. फायनलपूर्वी या संघाने कार्लसन, आर्यन तारी, रजवान प्रेयोटू आणि जेनिफिर यू यांचा पराभव केला आहे. दरम्यान, जो संघ 8.5 गुण मिळवतो, त्या संघाला विजय दिला जातो. इंडियन योगीज या संघाने चारही बोर्डवर विजय मिळवला आहे. मॅग्नस कार्लसन याचा पराभव करणाऱ्या गुजरातीची सध्या चर्चा सुरु आहे. मॅग्नस कार्लसन याचा पराभव करत विदित गुजराती भारतीय ग्रँडमास्टर (Indian GrandMaster) आर प्रज्ञानानंद, डी गुकेश आणि अर्जुन एरिगेसी यांच्या रांगेत स्थान मिळवलं आहे.