(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कांगारुंचं नेमकं चाललंय तरी काय! कमिन्स, वॉर्नरनंतर आता आणखी एक खेळाडू ऑस्ट्रेलियाला गेला
India vs Australia : पहिल्या दोन कसोटी सामन्यानंतर जगातील नंबर 1 कसोटी संघ अन् खेळाडू पूर्णपणे खचलेले दिसत आहेत.
India vs Australia : बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिायचा संघ भारतीय टीमला आव्हान देईल, असं म्हटलं जात होतं. पण पहिल्या दोन कसोटी सामन्यानंतर जगातील नंबर 1 कसोटी संघ अन् खेळाडू पूर्णपणे खचलेले दिसत आहेत. एकापाठोपाठ एक खेळाडू मायदेशात परत जात आहेत. कर्णधार पॅट कमिन्स, जोश हेजलवूड, डेविड वॉर्डर हे दिग्गज मायदेशी परतले आहेत. त्यात आता आणखी एका खेळाडूची भर पडली आहे. अॅश्टन अगर याला मायदेशात पाठवण्यात आले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी त्याला मायदेशी बोलवण्यात आले आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यात दारुण पराभव स्विकारल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पलटवार करणार का? असा प्रश्न उपस्थित होता. पण आता एकापाठोपाठ एक खेळाडू मायदेशात परतत आहेत.
भारताच्या फिरकी जोडीसमोर ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज फलंदाजांना आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. नागपूर आणि दिल्ली कसोटी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी लोटांगन घातल्याचं दिसलं. दिल्ली आणि नागपूर कसोटी अवघ्या तीन दिवसात संपली. यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघावर टीका होत आहे. त्यातच कर्णधार पॅट कमिन्स कौटंबिक कारणामुळे मायदेशी परतला आहे. त्यानंतर दुखापतीमुळे डेविड वॉर्नरही मालिकेतून बाहेर गेला. जोश हेजलवूड याच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह आहे. त्यातच भर म्हणून आता फिरकीपटू अॅशटन एगर याला टीम मॅनेजमेंटने मायदेशात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत क्रिकेटसाठी अगरला मायदेशात पाठवण्याचा निर्णय टीम मॅनेजमेंटने घेतला आहे.
भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा करण्यात आली, त्यात डावखुरा फिरकी गोलंदाज मॅथ्यू कुहनेमन याचा समावेश करण्यात आला नव्हता. पण पहिल्या कसोटी सामन्यानंतर मिचेल स्वेप्सन मायदेशात परतला तेव्हा दुसऱ्या कसोटी सामन्यात अचानक कुहनेमन याला संधी देण्यात आली. बॉर्डर गावस्कर मालिकेत ऑस्ट्रेलियाची रणनिती अपयशी ठरली आहे. दिल्ली कसोटीमध्ये तर संपूर्ण ऑस्ट्रेलियाचा संघ स्विपच्या जाळ्यात अडकला. अश्विन-जाडेजाच्या फिरकीपुढे ऑस्ट्रेलियाच्या फंलदाजांनी नांगी टाकली होती. ऑस्ट्रेलियासाठी जमेची बाजू म्हणजे, मिचेल स्टार्क आणि खॅमरुन ग्रीन अखेरच्या दोन कसोटीसाठी फिट असल्याचं सांगण्यात आलेय.
भारत दौऱ्यावर असणारा ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. भारतीय मैदानावर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे. त्यातच वॉर्डर, कमिन्स आणि हेजलवूड यासारखे दिग्गज खेळाडू संघाबाहेर गेल्यामुळे आणखी अडचणी वाढण्याची शक्यता आहे. बॉर्डर गावस्कर मालिकेतील पहिला सामना भारताने एक डाव आणि 132 धावांनी जिंकला होता. हा सामना नागपूर येथे खेळवण्यात आला होता. तर दिल्ली येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने सहा विकेट्सने विजय मिळवला होता. आता इंदूर येथे तिसरा कसोटी सामना होणार आहे.