एक्स्प्लोर
विराट शून्यावर बाद, खापर पाकिस्तानी सेल्फी गर्लवर!
मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफीमधील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने टीम इंडियाचा सात विकेट्सने पराभव केला. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली खातं न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने पाच चेंडूंचा सामना केला, पण त्याला भोपळाही फोडता आला आहे.
पण विराट कोहली फ्लॉप ठरल्यामुळे चाहत्यांनी त्याच्या महिला चाहतीला दोषी ठरवलं आहे. सामन्याआधी या पाकिस्तानी तरुणीने विराटसोबत सेल्फी काढला होता. तिच्यामुळेच विराट शून्यावर बाद झाल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे.
ती तरुणी कोण?
विराटसोबत सेल्फीमध्ये दिसणाऱ्या तरुणीचं नाव जेनब अब्बास आहे. ती पाकिस्तानची टीवी अँकर आणि क्रिकेट अनालिस्ट आहे. श्रीलंकाविरुद्धच्या सामन्याआधी तिने विराटसोबत सेल्फी काढला आणि या सामन्यात विराट शून्यावर बाद झाला.
डिव्हिलियर्ससोबतही सेल्फी आणि शून्यावर बाद
याआधी जेनबने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलियर्ससोबतही सेल्फी घेतला होता. विशेष म्हणजे पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात डिव्हिलियर्सही शून्यावर बाद झाला होता, तेही पहिल्याच चेंडूवर. कारकीर्दीत डिव्हिलियर्स पहिल्यांदाच गोल्डन डक झाला.
तर विराट कोहलीही यापूर्वी 2014 मध्ये शून्यावर बाद झाला होता. हा सामना इंग्लंडविरुद्ध होता.
या दोन्ही स्टार खेळाडूंसोबत जेनबने सेल्फी काढला आणि नंतर दोघेही शून्यावरच बाद झाले. त्यामुळे ही तरुणी चाहत्यांच्या टीकेचं लक्ष्य बनली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement