एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नरसिंगविरुद्ध षडयंत्र नाही, जाणूनबुजून उत्तेजकसेवन : क्रीडा लवाद
मुंबई : पैलवान नरसिंग यादववर 4 वर्षांची बंदी घातलेल्या निर्णयाचं क्रीडा लवादाकडून समर्थन करण्यात आलेलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नरसिंगविरोधात कोणताही कट केला गेला नसून तो स्वतः उत्तेजक द्रव्य घेत असल्याचं क्रीडा लवादाने म्हटलं आहे.
या अहवालानंतर भारतीय कुस्ती महासंघ आणि नाडाच्या एकंदर कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या अहवालानुसार नरसिंगने एकदा नाही तर अनेकवेळा जाणूनबुजून प्रतिबंधित केलेली उत्तेजीत द्रव्य घेतल्याचं क्रीडा लवादाचं म्हटलं आहे.
पैलवान नरसिंह यादववर चार वर्षाची बंदी, ऑलिम्पिकचं स्वप्नं भंगलं
त्यामुळे आपल्याविरोधात कट रचल्याचा नरसिंग यादवचा बचाव क्रीडा लवादाकडून धुडकावला गेला आहे. त्यामुळे या प्रकरणाचं गूढ आता वाढलेलं आहे. 'वाडा'ने बजावलेल्या नोटिशीची कल्पना भारतीय कुस्ती महासंघाला किंवा नरसिंग यादवला नव्हती. ही नोटीस बजावल्याची माहिती उशिरा समजल्यामुळेच नरसिंगचा बचाव करता आला नाही, किंवा त्याच्याऐवजी दुसऱ्या पैलवानाला पाठवता आलं नाही, असा दावा भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण यांनी केला आहे. काय आहे प्रकरण ? उत्तेजक सेवनप्रकरणी नरसिंग यादवला नॅशलन अँटी डोपिंग एजन्सी अर्थात नाडानं क्लीनचिट दिली होती. पण नाडाच्या या निर्णयाचा वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी म्हणजेच वाडानं विरोध केला. वाडानं नाडाच्या त्या निर्णयाविरोधात क्रीडा लवादाकडे अपील केलं होतं. अखेर चार तासांच्या चर्चेनंतर क्रीडा लवादानं नरसिंगला चार वर्षांच्या बंदीची शिक्षा सुनावली. क्रीडा लवादाच्या पॅनेलनं शिक्षा सुनावतानाच ऑलिम्पिक क्रीडाग्रामही सोडून मायदेशी परतण्याचा दिलेला आदेश नरसिंगला सहन झाला नव्हता. तो बसल्या जागीच बेशुद्ध झाला, अशी माहिती भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी दिली होती. भारतीय कुस्ती महासंघ अजूनही नरसिंग यादवच्या पाठीशी असल्याचंही ब्रिजभूषण यांनी स्पष्ट केलं होतं.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement