एक्स्प्लोर

टीम इंडियाची निवड करणाऱ्यांनी स्वत: किती क्रिकेट खेळलंय... वाचा

बीसीसीआयच्या निवड समितीमध्ये एमएसके प्रसाद, देवांग गांधी, शरणदीप सिंह, जतिन परांजपे आणि गगन खोडा यांचा समावेश आहे. मात्र निवड समितीतील या पाच सदस्यांना वन डे क्रिकेटचा फार मोठा अनुभव नाही.

मुंबई : वर्ल्ड कप 2019 साठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने टीम इंडियाची घोषणा केली. भारतीय टीमची घोषणा होण्याआधी अनेकांनी संभाव्य टीमबाबत अंदाज बांधले होते. मात्र वर्ल्ड कपसाठी कोणते खेळाडू पाठवायचे याची जबाबदारी बीसीसीआयने निवड समितीच्या सदस्यावर सोपवलेली असते. मात्र ज्यांनी वर्ल्ड कपसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली, त्यांनी किती क्रिकेट खेळलं आहे आणि त्यांची कारकिर्द कशी होती, हे जाणून घ्यायची उत्सुकता सर्वांना आहे.

बीसीसीआयच्या निवड समितीची मुख्य जबाबदारी एमएसके प्रसाद यांच्यावर आहे. प्रसाद यांच्या व्यतिरिक्त या समितीत देवांग गांधी, शरणदीप सिंह, जतिन परांजपे आणि गगन खोडा यांचा समावेश आहे. मात्र निवड समितीतील या पाच सदस्यांना वन डे क्रिकेटचा फार मोठा अनुभव नाही. या पाचही सदस्यांचा मिळून केवळ 31 वन डे सामन्यांचा अनुभव आहे.

VIDEO | पाकिस्तानला क्रिकेटच्याही मैदानात पराभूत करा : सचिन तेंडुलकर

एमएसके प्रसाद 43 वर्षीय मन्नवा श्रीकांत प्रसाद विकेटकीपर, फलंदाज यांनी प्रथम श्रेणी सामन्यात सहा शतक ठोकले आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्यांची कारकिर्द प्रभावशाली नव्हती. प्रसाद यांनी एकूण 6 टेस्ट आणि 17 वन डे सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. वन डे सामन्यात त्यांनी 14.55 च्या सरासरीने 131 धावा केल्या असून 63 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे.

देवांग गांधी 47 वर्षीय देवांग गांधी यांना एकूण 4 टेस्ट आणि 3 वन डे सामन्यांचा अनुभव आहे. तीन वन डे सामन्यात देवांग यांनी 16.33 च्या सरासरीने 49 धावा केल्या आहेत.

शरणदीप सिंह शरणदीप सिंह यांना एकूण 3 टेस्ट आणि 5 वन डे सामन्यांचा अनुभव आहे. शरणदीप यांनी पाच वनडे सामन्यात 15.66 च्या सरासरीने 47 धावा केल्या आहेत. शरणदीप यांनी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेशचं प्रतिनिधित्व केलं आहे.

जतिन परांजपे जतिन परांजपे यांनी प्रथम श्रेणीत 46 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. मात्र त्यांनी भारताकडून केवळ चार वन डे सामने खेळले आहेत.

गगन खोडा गगन खोडा 1991-92 मध्ये रणजी सामन्यात शतक ठोकल्याने चर्चेत आले होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी 300 धावांची सर्वोत्तम खेळी केली आहे. मात्र त्यांची वन डे आतंरराष्ट्रीय कारकिर्द अवघ्या दोन सामन्यांची आहे.

संबंधित बातम्या

विश्वचषकाची टीम इंडियाची घोषणा, पाहा कोणकोणत्या क्रिकेटपटूंची निवड

World Cup 2019 साठी टीम इंडिया जाहीर : भारताकडे काय आहे, काय नाही?

महत्त्वाच्या बातम्या

BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
IND vs SL 1st Test DAY-4 : चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?
चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?
Nitish Rana Emotional DPL VIDEO : 27 चेंडूत अर्धशतक... आकाशाकडे बघताच दिवंगत आईची आठवण अन् पुढच्याच क्षणी अश्रूंचा बांध फुटला! नीतीश राणाचा काळजाला भिडणारा VIDEO
27 चेंडूत अर्धशतक... आकाशाकडे बघताच दिवंगत आईची आठवण अन् पुढच्याच क्षणी अश्रूंचा बांध फुटला! नीतीश राणाचा काळजाला भिडणारा VIDEO
IND vs SL 1st TEST : भारताविरुद्ध सुरू असलेल्या कसोटीत श्रीलंकेच्या प्लेइंग-11मध्ये मोठा बदल, दिनेश चंडिमल OUT; 26 वर्षीय खेळाडूचा थेट डेब्यू
भारताविरुद्ध सुरू असलेल्या कसोटीत श्रीलंकेच्या प्लेइंग-11मध्ये मोठा बदल, दिनेश चंडिमल OUT; 26 वर्षीय खेळाडूचा थेट डेब्यू

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Embed widget