एक्स्प्लोर
टीम इंडियाच्या शिलेदारांवर बीसीसीआयकडून रोख बक्षीस
शिमला : विराट कोहलीच्या टीम इंडियाला कसोटी क्रमवारीत मिळवलेल्या 'नंबर वन'साठी आयसीसीकडून दहा लाख डॉलर्सचं घसघशीत इनाम मिळालंच, पण बीसीसीआयनेही टीम इंडियाच्या शिलेदारांवर रोख बक्षिसाचा वर्षाव केला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चारही कसोटी सामन्यांमध्ये खेळलेल्या भारतीय संघाच्या सदस्यांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. त्यानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना 25 लाख रुपयाचं, तर सपोर्ट स्टाफला प्रत्येकी 15 लाख रुपयाचं बक्षीस बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलं आहे.
दरम्यान, अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने धर्मशाला वनडेत ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने धुव्वा उडवून, कसोटी मालिकेत विजयाची गुढी उभारली. भारताने ही बॉर्डर-गावसकर मालिका 2-1 ने जिंकली.
ऑस्ट्रेलियावरील मालिका विजयाबरोबरच भारताचं कसोटी क्रमवारीतलं अव्वल स्थानही आणखी भक्कम झालं आहे. कसोटी संघांमध्ये भारत सध्या 122 गुणांसह पहिल्या तर ऑस्ट्रेलिया 108 गुणांसह दुसऱ्या आणि दक्षिण आफ्रिका 107 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement