Atish Todkar: जूनियर चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेमध्ये आतिश तोडकरनं सुवर्णपदक पटकावलं
बिहार राज्यातील पाटणा येथे 28 मार्च ते 31 मार्च दरम्यान पार पडलेल्या जूनियर चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेमध्ये बीड जिल्ह्याचा मल्ल आतिश तोडकरनं सुवर्णपदक पटकावलं आहे.
Atish Todkar: जूनियर चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेमध्ये आतिश तोडकरनं सुवर्णपदक पटकावलं आहे. बिहार राज्यातील पाटणा येथे 28 मार्च ते 31 मार्च दरम्यान पार पडलेल्या जूनियर चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेमध्ये बीड जिल्ह्याचा मल्ल आतिश तोडकरनं सुवर्णपदक पटकावलं आहे. मंगरुळ ता.आष्टी जिल्हा बीड येथील मल्ल आतिश तोडकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कुस्ती या खेळात सुवर्णमय कामगिरी केली आहे.
अतिश तोडकर गेल्या पाच वर्षापासून दिल्ली येथील कोच विरेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावली आहेत.त्यामध्ये तेलंगणा राज्यातील वारंगल येथे झालेल्या ज्युनियर कुस्ती स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. दिल्ली येथे झालेल्या स्कूल गेममध्ये त्यानं सुवर्णपदक मिळवले आहे. आज बिहार राज्यातील पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत हरियाणा राज्यातील मल्लाला चितपट करून 57 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. 24 एप्रिल 2022 पासून बल्गेरिया देशाची राजधानी सोफिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये तो भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
पटना येथे चालू असलेल्या जुनियर नॅशनल स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाला एक सुवर्ण आणि एक कास्य पदक मिळालं आहे. जुनियर नॅशनल च्या तिसऱ्या दिवशी फ्री- स्टाईल गटात 57 किलो सुवर्णपदक पटकावले, आतिश , जोग व्यायाम शाळा देवाची आळंदी येथे आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक प्रा. दिनेश गुंड यांच्या कडे सराव करतो. तसेच रविराज चव्हाण यानं कास्य पदक पटकावलं. रविराज हा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे येथे अर्जुन वीर काका पवार यांच्या कडे सराव करतो . या स्पर्धेसाठी परिषदेकडून प्रशिक्षक म्हणून रणजित महाडिक , संदीप पटारे व सोमनाथ फुलसुंदर यांनी जवाबदारी उत्तम पार पाडली . सर्व पदक विजेते कुस्तिगीर व त्याचे पालक आणी प्रशिक्षकांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
हे देखील वाचा-
- KKR vs PBKS, Head to Head : कोलकाता विरुद्ध पंजाब आमने-सामने, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी
- KKR vs PBKS : आजची लढत केकेरआर विरुद्ध पंजाब किंग्स, अशी असू शकते संभाव्य अंतिम 11
- Evan Lewis Fastest Fifty : लखनौच्या विजयाचा शिल्पकार एविन लुईस, आयपीएल 2022 मधील विक्रमी कामगिरी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha