(Source: ECI/ABP News/ABP Majha)
KKR vs PBKS, Head to Head : कोलकाता विरुद्ध पंजाब आमने-सामने, अशी आहे आतापर्यंतची आकडेवारी
IPL 2022 : आज होणाऱ्या पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यापूर्वी दोन्ही संघ याआधी एकमेंकाविरुद्ध भिडले असताना कशी कामगिरी केली आङे ते पाहुया...
RCB vs KKR : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरु (KKR vs RCB) या आयपीएलमधील (IPL 2022) आजच्या सामन्यात दोन्ही संघाकडून दमदार खेळाडू मैदानात उतरतील. दोन्ही संघाचे नवे कर्णधार असल्याने नव्या रणनीतीने दोन्ही संघ खेळताना दिसतील. नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील मैदानात पार पडणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघामधील कोणता संघ चांगली कामगिरी करेल यासाठी त्यांच्या आजवरच्या इतिहासावर (Head to Head) एक नजर फिरवू...
कोलकाता विरुद्ध पंजाब Head to Head
आयपीएलमध्ये आजवर कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्या एकमेंकाविरुद्धच्या सामन्यांचा विचार करता दोन्ही संघानी आजवर 29 सामने एकमेंकाविरुद्ध खेळले आहेत. यामध्ये कोलकाता संघाचं पारडं बऱ्यापैकी जड असून त्यांनी पंजाबविरुद्ध अधिक विजय मिळवले आहेत. केकेआरने 19 सामन्यात पंजाबला मात दिली आहे. तर दुसरीकडे पंजाबने 10 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे आज केकेआरचं जिंकणार की पंजाब दम दाखवणार हे पाहावे लागेल.
आतापर्यंतचा सर्वोच्च आणि सर्वात कमी स्को
कोलकाता संघाने पंजाब किंग्सविरुद्ध सर्वाधिक म्हणजे 245 धावा केल्या आहेत. तर पंजाबने सर्वाधिक म्हणजे 214 धावा केकेआरविरुद्ध ठोकल्या आहेत. केकेआरकडून सर्वात कमी म्हणजे 109 रन त्यांनी पंजाबविरुद्ध केले आहेत. तर पंजाबचा केकेआरविरुद्धचा सर्वात कमी स्कोर 119 रन इतका आहे.
हे देखील वाचा-
- KKR vs PBKS : आजची लढत केकेरआर विरुद्ध पंजाब किंग्स, अशी असू शकते संभाव्य अंतिम 11
- IPL 2022, KKR vs PBKS : कोलकात्यासमोर आज पंजाबचे आव्हान, कधी, कुठे पाहाल सामना?
- Dywane Bravo IPL Record: चॅम्पियन डिजे BRAVO! मलिंगाचा विक्रम मोडला, ब्राव्होच्या नावावर नवा रेकॉर्ड
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha