एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'सुवर्ण'विजेती विनेश फोगाटला सरप्राईज, एअरपोर्टवरच साखरपुडा
कुस्तीत गोल्ड जिंकून भारतात परतल्यानंतर विनेशने बर्थडेलाच विमानतळावरच साखरपुडा केला.
नवी दिल्ली: आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी भारताची महिला पैलवान विनेश फोगाटने, आपला जन्मदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. कुस्तीत गोल्ड जिंकून भारतात परतल्यानंतर विनेशने बर्थडेलाच विमानतळावरच साखरपुडा केला. विनेशने आपल्या विजयाचं सेलिब्रेशन तर केलंच, पण बर्थडेला साखरपुडा करुन तो संस्मरणीयही केला.
विनेशने आपला मित्र सोमवीर राठीसोबत लगीनगाठ बांधण्याचा निर्णय़ घेतला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
विनेस फोगाट शनिवारी 25 ऑगस्टला गोल्ड मेडल जिंकून भारतात परतली. त्यावेळी एअरपोर्टवर तिच्या साखरपुड्याची तयारी झाली होती. विनेशला याबाबत कल्पना नव्हती. एअरपोर्टवरच विनेश आणि सोमवीरने एकमेकांना अंगठ्या घातल्या. यावेळी दोघांच्या कुटुंबातील जवळचे नातेवाईकच हजर होते.
महत्त्वाचं म्हणजे 25 ऑगस्टलाचा विनेशचा जन्मदिवस होता. विनेशने त्याबाबत काही प्लॅनिंग केलं नव्हतं, मात्र तशी तिच्या कुटुंबीयांची इच्छा होती. विनेशचा जन्मदिवस खास व्हावा, यासाठी एअरपोर्टवरच तिच्या साखरपुड्याची तयारी करण्यात आली.
विनेश फोगाट सध्या 24 वर्षाची आहे. तिचा होणारा नवरा सोमवीर राठी हा सुद्धा पैलवान आहे. ग्रेको-रोमन प्रकारात त्याने राष्ट्रीय स्तरावर अनेक पदकं जिंकली आहेत.
विनेशने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर दोघांचा फोटो शेअर केला होता. दोघांचीही मैत्री नात्यामध्ये बदलण्यास कुटुंबीयांनी आधीच परवानगी दिली होती. त्यानुसार आशियाई स्पर्धेनंतर साखरपुडा आणि वर्ल्ड चॅम्पियन्सशीपनंतर लग्नाचा बार उडणार आहे.
विनेश आणि सोमवीर दोघेही पैलवान आहेत. दोघांनाही रेल्वेने नोकरी दिली. रेल्वेतील नोकरीच्या काळातच दोघांतील जवळीक वाढली. पैलवान असल्याने दोघेही एकमेकांशी सल्लामसलत करत, त्यातच नोकरीच्या निमित्तानेही एकत्र आल्याने, दोघांची मैत्री हळूहळू प्रेमात बदलत गेली. गप्पांचं रुपांतर भेटीगाठीत झालं, या भेटीतून एकमेकांना समजून घेतलं आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
राष्ट्रीय कुस्तीत सोमवीरला कांस्य
सोमवीर हा जींद जिल्ह्यातील गढवाली या गावचा आहे. सोमवीरने लहानपणापासूनच कुस्तीला सुरुवात केली. त्याने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं आहे. त्यानंतर त्याला रेल्वेने नोकरीत सामावून घेतलं. सध्या तो राजस्थानमध्ये कार्यरत आहे.
विनेशला सुवर्ण
भारताची महिला पैलवान विनेश फोगाटने जकार्ता एशियाडमध्ये सुवर्णपदकाची कमाई करून नवा इतिहास घडवला. तिने महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाईल गटात जपानच्या युकी इरीला अस्मान दाखवून सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.
संबंधित बातम्या
एशियाडमध्ये महिला पैलवान विनेश फोगाटला सुवर्ण
आता लक्ष्य एकच... टोकियो ऑलिम्पिक
Commonwealth Games 2018 : पैलवान विनेश फोगाटला 50 किलो वजनी गटात सुवर्णपदक
भारताची पैलवान विनेश फोगटच्या मिशन ऑलिम्पिकची दुर्दैवी अखेर
पैलवान विनेशसाठी राष्ट्रपतीही मंचावरुन खाली उतरले
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement