एक्स्प्लोर
Advertisement
एशियाडमध्ये महिला पैलवान विनेश फोगाटला सुवर्ण
विनेश फोगाटने बजरंग पुनियाच्या पावलावर पाऊल ठेवलं. तिने महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाईल गटात जपानच्या युकी इरीला अस्मान दाखवून सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.
जकार्ता : भारताची महिला पैलवान विनेश फोगाटने जकार्ता एशियाडमध्ये सुवर्णपदकाची कमाई करून नवा इतिहास घडवला. एशियाडमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती भारताची पहिली महिला पैलवान ठरली.
गीता फोगाटने 2010 साली भारताला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या महिला कुस्तीत पहिलं सुवर्णपदक जिंकून दिलं होतं.
विनेशने एशियाडच्या मॅटवर फोगाट कुटुंबियांच्या लौकिकाला साजेशी कामगिरी बजावली. तिने महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाईल गटात जपानच्या युकी इरीला अस्मान दाखवून सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.
विनेश फोगाटचं एशियाडमधलं हे दुसरं पदक ठरलं. 2014 सालच्या इन्चिऑन एशियाडमध्ये ती कांस्यपदकाची मानकरी ठरली होती. 2014 आणि 2018 सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत विनेश फोगाटने सुवर्णपदकं पटकावली आहेत.
बजरंग पुनियालाही सुवर्ण
पैलवान बजरंग पुनियाने जकार्ता एशियाडमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. बजरंगने 65 किलो फ्रीस्टाईल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. त्याने अंतिम लढतीत जपानच्या ताकातानी दाईचीचं कडवं आव्हान 10-8 असं मोडून काढलं.
या लढतीच्या पहिल्या फेरीत बजरंगने 6-0 अशी आघाडी घेतली होती. पण दाईचीने आक्रमक खेळ करून 6-6 अशी बरोबरी साधली. त्यानंतर अतिशय चुरशीच्या कुस्तीत बजरंगने दाईचीवर दोन गुणांनी कुरघोडी केली.
बजरंग पुनियाचं एशियाडमधलं हे दुसरं पदक ठरलं. त्याला 2014 सालच्या इन्चिऑन एशियाडमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं होतं. यंदा मात्र बजरंगने एशियाड सुवर्णपदकाची कसर भरुन काढली. याआधी ऑस्ट्रेलियातल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्याने सुवर्णपदक पटकावलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
निवडणूक
Advertisement