IND vs PAK Super 4 : 'भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात अक्षर पटेलच्या जागी दीपक हुड्डाला संधी द्या,' माजी क्रिकेटर वसीम जाफरचं मत
IND vs PAK 2022 : दुखापतग्रस्त रवींद्र जाडेजाच्या जागी अक्षर पटेल संघात सामील झाला आहे. आता त्याला अंतिम 11 मध्येही संधी मिळेल का? हे पाहावे लागेल.
Wasim Jaffer On Deepak Hooda : आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेत सुपर-4 राउंडमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) हे कट्टर प्रतिस्पर्धी आमने-सामने येणार आहेत. पण या महत्त्वाच्या सामन्यापूर्वीच भारताचा स्टार अष्टपैलू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. दरम्यान दुखापतग्रस्त रवींद्र जाडेजाच्या जागी अक्षर पटेल (Axar Patel) संघात सामील झाला आहे. पण सामन्यात अक्षरच्या जागी दीपक हुडाला संधी द्यावी असं मत भारताचा माजी खेळाडू वसिम जाफर याचं आहे. दीपक हुडा 15 सदस्यीय संघात असून सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात त्याला अंतिम 11 मध्ये संधी मिळालेली नाही. आता त्याला तिसऱ्या सामन्यात संधी मिळावी असं जाफरचं म्हणणं आहे.
दीपक हुडामुळे भारताची फलंदाजी अजून मजबूत होणार - जाफर
भारतीय संघातील महत्त्वाचा खेळाडू रवींद्र जाडेजा दुखापतीमुळे आशिया कप स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी अष्टपैलू अक्षर पटेलला संधी मिळाली आहे. अक्षरने नुकतीच वेस्ट इंडिजविरुद्ध चांगली कामगिरी केली होती. पण दीपक हुडाला संघात संधी दिल्यास त्याच्यामुळे भारताची फलंदाजी अधिक मजबूत होईल, असा विश्वास माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने व्यक्त केला आहे. दरम्यान आता भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात नेमकी कोणाला संधी मिळेल हे पाहावे लागेल.
रविवारी होणार महामुकाबला
भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) हा सामना रविवारी अर्थात 4 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवला जाणार आहे. याआधी ग्रुप स्टेजमधील सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 विकेट्सनी मात दिली होती. यावेळी आधी फलंदाजी करत पाकिस्तानने 147 धावा केल्या होत्या. भारताने 19.4 षटकात 5 गडी गमावत 148 धावांचे लक्ष गाठले. यावेळी जाडेजा आणि पांड्या यांनी कमाल कामगिरी केली होती.
हे देखील वाचा-