Asia Cup 2023 : 'पड़ोसियों से प्यार करने बुरी बात नहीं है', विराट कोहलीच्या पाकिस्तानी चाहतीच्या उत्तराने मनं जिंकली
Asia Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा निकाल पावसामुळे लागला नाही. या सामन्यानंतर एका पाकिस्तानी तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'पड़ोसियों से प्यार करना बुरी बात नहीं,' असंही ती म्हणाली.
Virat Kohli's Pakistani Female Fan : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहलीचे (Virat Kohli) जगभरात लाखो चाहते आहेत. भारताचा शेजारचा देश पाकिस्तानमध्येही (Pakistan) विराट कोहलीवर प्रेम करणारे अनेक चाहते आहेत. आशिया चषकात (Asia Cup 2023) शनिवारी (2 सप्टेंबर) भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) आमनेसामने आले होते. परंतु पावसामुळे सामन्याचा निकाल लागला नाही. या सामन्यानंतर एका पाकिस्तानी तरुणीचा (Pakistani Fan) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून जी स्वत:ला विराट कोहलीची चाहती असल्याचं सांगते. 'पड़ोसियों से प्यार करना बुरी बात नहीं,' असंही ती म्हणाली.
व्हायरल व्हिडीओमध्ये विराट कोहलीची पाकिस्तानी चाहती म्हणते की, "विराट कोहली माझा आवडता खेळाडू आहे. मी फक्त विराटसाठीच सामना पाहण्यासाठी आले होते आणि मला कोहलीच्या शतकाची अपेक्षा होती." यानंतर महिला चाहत्याला विचारण्यात आले की, तुम्ही कोणाला सपोर्ट करत आहात? याला उत्तर देताना तिने सांगितलं की, मी पाकिस्तानला पाठिंबा देत आहे. महिलेने तिच्या दोन्ही गालावर भारत आणि पाकिस्तानचं चित्र दाखवत ‘ये पाकिस्तान और ये इंडिया’ असं म्हटलं.
'पड़ोसियों से प्यार करने बुरी बात नहीं है'
संबंधित तरुणी याबाबत बोलत असताना तिच्या शेजारी असलेल्या एका व्यक्तीने काहीतरी भाष्य केलं. त्यावर तिच्या एका वाक्याने सगळ्यांचं मनं जिंकली. दोन्ही देशांना पाठिंबा देण्याबाबत तिने सांगितलं की, "पड़ोसियों से प्यार करना बुरी बात तो नहीं है ना." तिच्या या उत्तराने सर्वांची मने जिंकली. कोहलीचं शतक बघता न आल्याने मन दुखावल्याचंही तिने व्हिडीओमध्ये सांगितलं. शिवाय बाबर आझम आणि विराट कोहली यांच्यात कोणाला निवडशील, असं विचारलं असता तिने विराट कोहली हे उत्तर दिलं.
A Pakistani baba stops this cute girl from loving Virat Kohli & India but this courageous girl gives a befitting reply to him and continues her support for Virat. Hats off to her.#INDvPAK #PAKvIND pic.twitter.com/9nh1M9FPbW
— Silly Context (@SillyMessiKohli) September 2, 2023
पावसामुळे भारत आणि पाकिस्तान महामुकाबला रद्द
दरम्यान, भारत आणि पाकिस्तानचा संघ चार वर्षांनी एकदिवसीय सामन्यात समोरासमोर आले. श्रीलंकेतील पल्लेकेलेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर शनिवारी हा सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना 48.5 षटकात सर्वबाद 266 धावा केल्या. मात्र पावसामुळे दुसरा डाव खेळता आला नाही आणि सामना रद्द झाला. यामुळे भारत आणि पाकिस्तानला प्रत्येकी एक गुण देण्यात आला. तत्पूर्वी पुढील सामन्यात भारताचा सामना नेपाळविरुद्ध होणार आहे.
हेही वाचा