Suresh Raina: मिस्टर आयपीएल पुन्हा मैदान गाजवण्यासाठी सज्ज; दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजांविरुद्ध दाखवणार दम
Road Safety World Series 2022: भारताचा स्टार फलंदाज सुरेश रैनाची जगभरातील दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये गणना केली जाते.
Road Safety World Series 2022: भारताचा स्टार फलंदाज सुरेश रैनानं (Suresh Raina) 15 ऑगस्ट 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला (International Cricket) अलविदा केलं होतं. त्यावेळी त्यानं आयपीएल (IPL) आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळत राहणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, 6 सप्टेंबर 2022 रोजी त्यानं आयपीएल (IPL) आणि देशांतर्गत क्रिकेटमधून (Domestic Cricket) निवृत्ती घेण्याचा निर्णय घेत चाहत्यांना धक्का दिला. यानंतर सुरेश रैनानं पुन्हा मैदानात पुनरागमन करणार असल्याची माहिती समोर आलीय. दरम्यान, आजपासून रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजला (Road Safety World Series 2022) सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात इंडिया लीजेंड्स (India Legends) आणि दक्षिण आफ्रिका लीजेंड्स (South Africa Legends) एकमेकांशी भिडणार आहे. या सामन्यात सुरेश रैना इंडिया लीजेंड्सच्या संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसण्याची शक्यता आहे.
सुरेश रैना रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजमध्ये खेळणार आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती देण्यात आलीय. आमच्याकडं क्रिकेटप्रेमींसाठी आणखी काही खास आहे.सर्व फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय सुरेश रैना रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या दुसऱ्या हंगामात इंडिया लिजेंड्समध्ये सामील होण्यासाठी सज्ज झाला आहे.”
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज ट्वीट-
सचिन तेंडुलकरकडं इंडिया लीजेंड्सचं नेतृत्व
रस्ता सुरक्षिततेबद्दल जागरूकता पसरवण्याच्या उद्देशानं भारत सरकारच्या रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाकडून रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचे आयोजन केलं जातं. या स्पर्धेत जगभरातील माजी क्रिकेटपटू सहभाग घेतात. भारतीय खेळाडूंचा समावेश असलेल्या संघाची धुरा पुन्हा एकदा दिग्गज सचिन तेंडुलकरकडं सोपवण्यात आली आहे. रैना व्यतिरिक्त, गतविजेत्या इंडिया लिजेंड्समध्ये युवराज सिंह, इरफान पठाण, हरभजन सिंह यांसारख्या अनेक स्टार भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.
इंडिया लीजेंड्स
सचिन तेंडुलकर (कर्णधार), युवराज सिंह, युसूफ पठाण, इरफान पठाण, हरभजन सिंह, नमन ओझा, सुरेश रैना, प्रज्ञान ओझा, विनय कुमार, मुनाफ पटेल, एस बद्रीनाथ, मनप्रीत गोनी, राहुल शर्मा, राजेश पवार, अभिमन्यू मिथुन , स्टुअर्ट बिन्नी.
हे देखील वाचा-