(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PAK vs AFG, Asia Cup LIVE: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याचे लाईव्ह अपडेट्स, एका क्लिकवर
PAK vs AFG Asia Cup, 2022 : आशिया चषकाच्या सुपर 4 फेरीत आज पाकिस्तान आणि अफगानिस्तान यांच्यात लढत होत आहे.
LIVE
Background
PAK vs AFG Asia Cup, 2022 : आशिया चषकाच्या सुपर 4 फेरीत आज पाकिस्तान आणि अफगानिस्तान यांच्यात लढत होत आहे. भारतीयांसाठी ही लढत महत्वाची आहे. कारण यामध्ये जर अफगानिस्तानच्या संघानं पाकिस्तानवर विजय मिळवला तर भारताला पुढे जाण्याची संधी मिळू शकते. पाकिस्तान संघाचा विजय झाल्यास... पाकिस्तान आणि श्रींलका यांच्यात फायनल होऊ शकते. भारतीय संघाला सुपर 4 च्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे भारतीय संघाचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलेय.
PAK vs AFG यांच्यामध्ये Asia Cup, 2022 स्पर्धेतील सुपर -4 चौथा सामना होणार आहे. Sharjah Cricket Stadium, Sharjah, United Arab Emirates मैदानावर दोन्ही संघ भिडणार आहेत. संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. सात वाजता नाणेफेक होईल.... एबीपी माझाच्या संकेतस्थळावरही या सामन्याचे लाईव्ह अपडेट पाहू शकता.
पाकिस्तान संघाने भारताचा पाच विकेटनं पराभव करत आशिया चषकाच्या सुपर 4 ची दणक्यात सुरुवात केली होती. पाकिस्तान टीमकडून भारताविरोधात मोहम्मद रिजवान,शादाब खान, मोहम्मद नवाज यांनी दमदार कामगिरी केली होती. बाबार अझमचा फॉर्म पाकिस्तानसाठी चिंतेचा विषय ठऱला आहे. आशिया चषकात बाबरला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. दुसरीकडे अफगाणिस्तान संघाला सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. श्रीलंकानं अफगाणिस्तानचा चार विकेटनं पराभव केला होता. पण अफगाणिस्तानने आशिया चषकातील आपल्या कामगिरीनं सर्वांनाच प्रभावित केलेय. सांघिक कामगिरीच्या जोरावर अफगाणिस्तानने सुपर चार मध्ये स्थान पटकावलेय. रहमानुल्ला गुरबाज, राशिद खान, मुजीब उर रहमान आणि कर्णधार मोहम्मद नबी यांच्या कामगिरीवर अफगाणिस्तानच्या नागरिकांचं लक्ष असेल.
भारताला अंतिम फेरी गाठायची असेल, तर सर्वात आधी आजच्या सामन्यात अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर विजय आवश्यक असेल. यानंतर भारतीय संघाला पुढील सामन्यात अफगाणिस्तानला पराभूत करावं लागेल. शेवटी भारताला पाकिस्तान आणि श्रीलंकेतील सामन्यात श्रीलंकेच्या विजयाची प्रार्थना करावी लागणार आहे. सुपर-4 मध्ये, श्रीलंका त्यांचे दोन्ही सामने जिंकून सुपर-4 टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. अंतिम फेरी गाठण्याच्या अगदी जवळ आहे. त्याचबरोबर पाकिस्तानचा संघ भारताला हरवून दुसऱ्या स्थानावर आहे. तर सुपर-4 मध्ये भारताने आपले दोन्ही सामने गमावले आहेत. आणि अफगाण संघ श्रीलंकेकडूनही सामना हरला आहे. अशा परिस्थितीत, आज अफगाणिस्तानच्या संघाने पाकिस्तानचा पराभव करणे भारतासाठी गरजेचं आहे.