(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Suresh Raina: मोठी बातमी! सुरेश रैनाचा आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये न खेळण्याचा निर्णय
Suresh Raina: भारताचा माजी स्टार क्रिकेटपटू सुरेश रैनानं आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतलाय.
Suresh Raina: भारताचा माजी स्टार क्रिकेटपटू सुरेश रैनानं आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतलाय. त्यानं याबाबत उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन (UPCA) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) कळवलं असल्याची माहिती समोर येत आहे. तो आता ख्रिस गेल, कायरन पोलार्ड इत्यादींप्रमाणे देश-विदेशातील क्रिकेट लीगमध्ये खेळताना दिसणार आहे.
मिस्टर आयपीएल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरेश रैनानं 15 ऑगस्ट 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आयपीएलच्या 205 सामन्यांमध्ये 5 हजार 528 धावा करणाऱ्या रैनाला गेल्या वर्षी चेन्नई सुपर किंग्जनं संघात कायम ठेवले नाही आणि मेगा ऑक्शनमध्येही तो अनसोल्ड ठरला. गाझियाबादच्या आरपीएल क्रिकेट मैदानावर रैना गेल्या एक आठवड्यापासून सराव करत आहे.
दैनिक जागरणनं दिलेल्या माहितीनुसार, सुरेश रैना म्हणाला की, "मला आणखी दोन-तीन वर्ष क्रिकेट खेळायचं आहे. उत्तर प्रदेशच्या संघात चांगल्या खेळाडूंचा समावेश झालाय. मी यूपीसीएकडून एनओसी म्हणजेच ना हरकत प्रमाणपत्र घेतलंय. बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनाही याबाबत माहिती देण्यात आलीय. मला पाठिंबा दिल्याबद्दल मी बीसीसीआय आणि यूपीसीएचे आभार मानतो. आता मी इतर लीगमध्ये सहभाग घेऊ शकतो." पुढे सुरेश रैना म्हणाला की, "येत्या 10 सप्टेंबरपासून रोड सेफ्टी सीरिजमध्ये खेळणार आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, यूएई येथील लीगनंही संपर्क साधला आहे. याबाबत काही समजताच मी माध्यमांना नक्कीच सांगेल."
सुरेश रैनाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
सुरेश रैनानं 226 एकदिवसीय, 18 कसोटी आणि 78 टी-20 सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलंय. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यानं पाच शतक आणि 36 अर्धशतकांच्या मदतीनं 5 हजार 615 धावा केल्या आहेत. तर, कसोटीत त्याच्या नावावर 768 धावांची नोंद आहे. याशिवाय टी-20 क्रिकेटमध्ये त्यानं 1 हजार 605 धावा केल्या आहेत. ज्यात एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे.
चेन्नई सुपरकिंग्जसाठी मोलाचं योगंदान
आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी संघांमध्ये चेन्नईच्या संघात समावेश केला जातो. चेन्नईच्या संघानं आतापर्यंत चार वेळा आयपीएलचे खिताब जिंकले आहेत. चेन्नईच्या विजयात सुरेश रैनाचं मोलाचं योगदान आहे. त्यानं अनेक सामन्यात मॅच विनर भूमिका बजावत संघाला विजय मिळवून दिलाय.
हे देखील वाचा-