(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs SL: भारत- श्रीलंका यांच्यात आज रंगणार थरार; कोणाचं पारडं राहिलंय जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड
IND vs SL Head-to-Head Records: यूएईमध्ये (UAE) सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेतील सामने अटीतटीचे होत आहेत.
IND vs SL Head-to-Head Records: यूएईमध्ये (UAE) सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेतील सामने अटीतटीचे होत आहेत. भारत आणि श्रीलंका यांच्यात आज सुपर फेरीतील तिसरा सामना खेळला जाणार आहे. हा सामना दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या मैदानावर भारतानं शेवटच्या तीन पैकी दोन सामने जिंकले आहेत. भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यापूर्वी दोन्ही देशातील हेड टू हेड रेकॉर्ड्सवर एक नजर टाकुयात.
भारतासाठी आजचा सामना महत्वाचा
भारतासाठी आजचा सामना खूप महत्त्वाचा असेल. या स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी भारताला विजय आवश्यक आहे. श्रीलंकाविरुद्ध पराभव झाल्यास भारताला अंतिम फेरी गाठणं अवघड होईल. भारत अशा परिस्थितीत आपलं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, श्रीलंकानं सुपर 4 फेरीतील त्यांच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. तसेच श्रीलंकेनं भारताविरुद्ध सामना जिंकल्यास त्यांचे अंतिम फेरीतील स्थान जवळपास निश्चित होईल.
भारत-श्रीलंकेचा अलिकडचा फॉर्म
दरम्यान, दोन्ही संघांचा अलीकडचा फॉर्म पाहता भारतीय संघाच पारडं जड दिसतंय. भारतानं यावर्षी 24 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यापैकी 18 सामने जिंकले आहेत. तर, 5 सामने गमावले आहेत. एक सामना निर्णित ठरला. दुसरीकडं श्रीलंकेच्या संघानं यावर्षी 14 टी-20 सामने खेळले आहेत. यापैकी श्रीलंकेला चार सामने जिंकता आले. तर, 9 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. यातील एक सामना अनिर्णित राहिलाय.
भारत-श्रीलंका हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 25 टी-20 आतंरराष्ट्रीय सामने खेळले गेले. यातील भारतानं 17 सामने जिंकले आहेत. तर, 7 सामन्यात श्रीलंकेच्या संघाला विजय मिळवता आलाय. तर, एक सामना अनिर्णित ठरलाय. यावर्षी भारत आणि श्रीलंका यांच्याती तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यात आली होती. ही मालिका भारतानेच जिंकली होती.
संघ-
भारताचा संभाव्य संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह.
श्रीलंकेचा संभाव्य संघ:
पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), चरित असलंका, दानुष्का गुनाथिलका, भानुका राजपक्षे, दासुन शानाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थेक्षाना/प्रवीण जयविक्रमा, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका.
हे देखील वाचा