एक्स्प्लोर

Argentina Vs Croatia: फिफाच्या पहिल्या सामन्यात पराभव, तर फायनल्समध्ये एन्ट्री; धडाकेबाज अर्जेंटिनानं कसं नमवलं क्रोएशियाला?

Argentina Vs Croatia FIFA World Cup 2022 Semifinal: गेल्या विश्वचषकाचा उपविजेता क्रोएशिया 2022 च्या फिफा विश्वचषकातून बाहेर पडला. अर्जेंटिनानं उपांत्य फेरीच्या सामन्यात क्रोएशियाचा 3-0 असा पराभव केला.

Argentina Vs Croatia FIFA World Cup 2022 Semifinal: फिफा विश्वचषक (FIFA World Cup 2022) सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यात अर्जेंटिनानं (Argentina) क्रोएशियाचा (Croatia) पराभव करत फायनल्समध्ये (FIFA World Cup 2022 Final) आपलं तिकीट कन्फर्म केलं आहे. अर्जेंटिनानं धडाकेबाज कामगिरी करत 3-0 अशा फरकानं क्रोएशियाचं फिफामधील स्वप्न संपुष्टात आणलं. अर्जेंटिनाच्या विजयाचं संपूर्ण श्रेय कर्णधार आणि दिग्गज फुटबॉलर लियोनेल मेस्सी (Lionel Messi) आणि ज्युलियन अल्वारेज (Julian Alvarez) यांना जातं. मेस्सीनं एक गोल, तर अल्वारेजनं दोन गोल करत अर्जेंटिनाला फायनल्समध्ये प्रवेश मिळवून दिला. संपूर्ण सामन्यात क्रोएशियाला मात्र एकही गोल करता आला नाही. 

पहिला गोल: 34व्या मिनटाला अर्जेंटिनाचा कर्णधार आणि दिग्गज फुटबॉलर कर्णधार लियोनेल मेस्सीनं पेनल्टीवर गोल केला
दुसरा गोल: 39व्या मिनटाला अर्जेंटिनासाठी ज्युलियन अल्वारेजनं गोल केला
तिसरा गोल: 69व्या मिनटाला अल्वारेजनं कर्णधार मेस्सीच्या पासवर दुसरा गोल केला 

सेमिफायनल्समध्ये काय घडलं? 

  • क्रोएशियानं संपूर्ण सामन्यात आक्रमक खेळी करताना दिसली. गोल करण्याचे अनेक प्रयत्नही केले, पण एकही प्रयत्न यशस्वी झाला नाही. अखेर अर्जेंटिनानं आपली 3-0 अशी आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत फायनल्सचं तिकीट कन्फर्म केलं. 
  • 75व्या मिनिटाला अर्जेंटिनानं दोन बदली खेळाडू घेतले. दोन गोल करणारा अल्वारेझ आणि रॉड्रिगो डी पॉल बाहेर बसवण्यात आलं. त्याच्या जागी फॉरवर्ड पाउलो डायबाला आणि मिडफिल्डर एक्क्विएल पॅलासिओसला पर्याय म्हणून मैदानात उतरवण्यात आले.
  • 69व्या मिनिटाला ज्युलियन अल्वारेझनं सामन्यातील दुसरा गोल करून अर्जेंटिनाला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. अर्जेंटिनासाठी केलेला तिसरा गोल अल्वारेझनं मेस्सीनं दिलेल्या पासवर केला. या विश्वचषकात अल्वारेझनं आतापर्यंत एकूण 4 गोल केले आहेत, तर मेस्सीने आतापर्यंत 3 गोल केले आहेत. 
  • मिडफिल्डर लिएंड्रो परेडेसला 62व्या मिनिटाला बेंचवर बसवण्यात आलं. त्याच्याएवजी लिसांद्रो मार्टिनेझला पर्याय म्हणून मैदानात उतरवण्यात आलं. म्हणजेच, अर्जेंटिनानं इथेच आपला डिफेंस आणखी मजबूत केला. 
  • 50व्या मिनिटाला क्रोएशियानं मार्सेलो ब्रोझोविचला बाहेर पाठवत, त्याच्याऐवजी ब्रुनो पेटकोविचला पर्याय म्हणून मैदानात उतरवलं. क्रोएशियाकडून करण्यात आलेला सामन्यातील हा पहिला बदल होता.
  • 47व्या मिनिटाला म्हणजेच, सामन्याच्या दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला अर्जेंटिनाच्या फाऊलवर क्रोएशियाला फ्री किक मिळाली. मात्र क्रोएशियाला त्याचा फायदा उठवता आला नाही.

पहिल्या हाफमध्ये अर्जेंटिनानं मिळवलं सामन्यात वर्चस्व 

सामन्याच्या फर्स्ट हाफमध्ये क्रोएशियाच्या संघानं आक्रमक खेळाची सुरुवात केली. मात्र 34व्या मिनिटाला मेस्सीनं पेनल्टीवर गोल करत बाजी मारली. 5 मिनिटांनंतर अल्वारेझनं दुसरा गोल करत क्रोएशियाला पूर्णपणे बॅकफूटवर ढकललं. पूर्वार्धात अर्जेंटिनानं गोलचे 5 प्रयत्न केले, त्यापैकी 4  ऑन टारगेट होते. क्रोएशियाने 4 वेळा प्रयत्न केले आणि एकही शॉट ऑन टारगेट नव्हता. दरम्यान, सर्वाधिक बॉल पजेशन क्रोएशियाकडे 62 टक्के आणि अर्जेंटिनाकडे केवळ 38 टक्के होतं.

  • फर्स्ट हाफ: सामन्याच्या फर्स्ट हाफमध्ये अर्जेंटिनानं दोन गोल करत 2-0 अशी आघाडी घेतली. क्रोएशियाचा संघ पूर्णपणे बॅकफूटवर दिसत होता. हे दोन गोल मेस्सी आणि अल्वारेझनं केले.
  • 39व्या मिनिटाला ज्युलियन अल्वारेझनं गोल करत अर्जेंटिनाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. 21 वर्षीय अल्वारेझचा या विश्वचषकातील हा तिसरा गोल आहे.
  • 34व्या मिनिटाला लिओनेल मेस्सीनं पेनल्टीवर गोल केला. त्यामुळे अर्जेंटिनानं क्रोएशियाविरुद्ध 1-0 अशी आघाडी घेतली.
  • 32व्या मिनिटाला क्रोएशियाचा गोलरक्षक डॉमिनिक लिव्हकोविकनं अल्वारेझला फाऊल केलं, त्यावर गोलकिपरला यल्लो कार्ड दाखवण्यात आलं. त्यावेळी अर्जेंटिनाला पेनल्टी मिळाली.
  • 25 मिनिटांत एन्झो फर्नांडिसनं गोलपोस्टवर म्हणजेच, ऑन टार्गेट गोल करण्याचा प्रयत्न केला. पण, क्रोएशियाचा गोलरक्षक लिव्हाकोविचनं त्याला अपयशी केलं. सामन्यात आतापर्यंत एकही गोल झाला नव्हता.
  • क्रोएशियानं थोडी आक्रमक खेळी केली, पण त्याचा काही फायदा झाला नाही. आतापर्यंत चेंडूचा ताबा क्रोएशियाकडे 58 टक्के आणि अर्जेंटिनाकडे 42 टक्के होता.
  • 13व्या मिनिटाला लुका मॉड्रिचने गोल केला, त्यावर अर्जेंटिनाला फ्री किक मिळाली. दोन्ही वेळा मेस्सीच्या संघाला कोणताही फायदा झाला नाही. क्रोएशियानं किक ऑफ केली आणि त्यानंतर त्यांनी 7व्या
  • मिनिटाला पहिला फाऊल केला. ज्यावर अर्जेंटिनाला फ्री किक मिळाली. अर्जेंटिना संघानं या सामन्यात 4-4-2 आणि क्रोएशिया 4-3-3 अशा लाइनअपसोबत मैदानात उतरली होती. 

क्रोएशियाचं स्वप्न भंगलं

अर्जेंटिनाकडून झालेल्या परभवानंतर अनुभवी खेळाडूंनी सजलेल्या क्रोएशियन संघाचं पहिलं विश्वचषक जेतेपद पटकावण्याचं सोनेरी स्वप्न भंगलं. या संघानं गेल्या विश्वचषकात अंतिम सामना खेळला होता. जिथे त्यांना फ्रान्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. 2018 मध्ये क्रोएशिया फक्त एकदाच अंतिम फेरीत पोहोचला होता. तर क्रोएशियन संघ तिसऱ्यांदा सुपर-4मध्ये पोहोचला आहे. सर्वप्रथम 1998 मध्ये हा संघ तिसऱ्या क्रमांकावर होता. यावेळीही ती सुपर-4 मध्ये पराभूत होऊन बाहेर पडली. आता क्रोएशियाला दुसऱ्या सेमीफायनलमध्ये पराभूत झालेल्या फ्रान्स किंवा मोरोक्कोविरुद्ध नंबर-3च्या लढतीसाठी खेळावं लागेल.

मेस्सीच्या विश्वचषकाची सुरुवात दारुण पराभव 

या विश्वचषकात अर्जेंटिनाचा पहिला सामना सौदी अरेबिया विरुद्ध झाला होता. या सामन्यात अर्जेंटिनाचा 1-2 नं पराभव झाला होता. यानंतर मेक्सिको आणि नंतर पोलंडला सलग सामन्यात 2-0 नं पराभूत करून सुपर-16 मध्ये प्रवेश केला. त्यानंतर प्री-क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा 2-1 असा पराभव केला. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड संघाचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 असा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. येथेही क्रोएशियाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP MajhaManoj jarange Patil On Maratha : 13 तारखेपर्यंत थांबा! मराठा समाज बघतोय कोण येतं? कोण नाही? - पाटीलABP Majha Headlines : 12 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Kolhapur Viral Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
लक्ष्मण हाकेंचा बीपी वाढला, प्रकृती खालावली, उपोषणाचा आज चौथा दिवस
लक्ष्मण हाकेंचा बीपी वाढला, प्रकृती खालावली, उपोषणाचा आज चौथा दिवस
Embed widget