एक्स्प्लोर
VIDEO | रनआऊट करण्यासाठी गुलबदिनचा मॉर्गनला पकडण्याचा प्रयत्न
अफगाणिस्तानने आतापर्यंत विश्वचषकातील सर्व सामने गमावल्यामुळे त्यांच्या खात्यात एकही गुण जमा झालेला नाही. गुणांचं खातं उघडण्यासाठी उत्सुक असलेल्या या संघाला विजयाचे वेध लागले आहेत.
लंडन : विश्वचषकातील साखळी सामन्यात इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांचा सामना रंगण्यापूर्वीच यजमान संघ बाजी मारेल, याचा कयास चाहत्यांनी मांडला होता. हा सामना तितकासा उत्कंठावर्धक झाला नसला, तरी इंग्लंडच्या फलंदाजीवेळी 32 व्या षटकात एक वेगळाच प्रकार घडला. अफगाणिस्तानी कर्णधार गुलबदिन नायब याने इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनला रन आऊट करण्यासाठी हलकंसं पकडल्याचं दिसलं.
अफगाणिस्तानने आतापर्यंत विश्वचषकातील सर्व सामने गमावल्यामुळे त्यांच्या खात्यात एकही गुण जमा झालेला नाही. इतकंच काय, इतर संघांवर मेहरबान असलेला वरुणराजा एकदाही अफगाणिस्तानच्या सामन्यावेळी कोसळला नाही. त्यामुळे बक्षिसाच्या स्वरुपात मिळणार एक गुणही अफगाण संघाच्या पदरात पडला नाही. गुणांचं खातं उघडण्यासाठी उत्सुक असलेल्या या संघाला विजयाचे वेध लागले आहेत.
मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियममध्ये इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जेम्स विन्सी लवकर तंबूत परतल्यानंतर जो रुट आणि जॉनी बेअरस्टो यांनी अफगाणिस्तानच्या नाकी नऊ आणले. कर्णधार मॉर्गन मैदानात उतरला आणि अफगाणिस्तानचं अक्षरशः धाबं दणाणलं.
32 व्या षटकात मॉर्गन दुसरी धाव काढून क्रीझमध्ये परतत असताना गुलबदीनने त्याला हलकंसं रोखण्याचा प्रयत्न केला. मॉर्गन रनआऊट व्हावा, हा त्याचा उद्देश होता. मात्र मॉर्गन कसाबसा क्रीझमध्ये परतला. परंतु या गडबडीत त्याच्या हातातून बॅट खाली पडली. गुलबदीनने ती बॅट स्वतः उचलून मॉर्गनला परत दिली.
इयॉन मॉर्गनने वन डे सामन्यांच्या इतिहासात एका डावात सर्वाधिक 17 षटकार ठोकण्याचा विश्वविक्रम रचला आहे. त्याने अफगाणिस्तानविरुद्धच्या विश्वचषक सामन्यात 71 चेंडूंत 148 धावांची खेळी उभारली. त्याच्या या खेळीला 17 षटकार आणि चार चौकारांचा साज होता.
इंग्लंडने अफगाणिस्तानचा 150 धावांनी धुव्वा उडवून, विश्वचषकातल्या पाचव्या सामन्यात आपला चौथा विजय साजरा केला. या विजयासह इंग्लंडने गुणतालिकेत आठ गुणांसह अव्वल स्थान गाठलं. मॅन्चेस्टरमधल्या सामन्यात इंग्लंडने अफगाणिस्तानला विजयासाठी 398 धावांचं आव्हान दिलं होतं.
जोफ्रा आर्चर, आदिल रशिद आणि मार्क वूडच्या प्रभावी आक्रमणासमोर अफगाणिस्तानला 50 षटकांत आठ बाद 247 धावांची मजल मारता आली. आर्चर आणि रशिदने प्रत्येकी तीन, तर वूडने दोन फलंदाजांना माघारी धाडलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement