एक्स्प्लोर

बांगलादेशपासून भारताला हे 5 धोके

मुंबई : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात लढत होणार आहे. बांगलादेशला भारताच्या तुलनेत कमकुवत समजलं जात असलं तरी जुने अनुभव पाहता टीम इंडियाचे शिलेदार ही चूक करणार नाहीत. बांगलादेशने अनेकदा कुणी अंदाजही लावला नसेल, अशा परिस्थितीत बलाढ्य संघांना हरवलेलं आहे. बांगलादेशने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. त्यामुळे बांगलादेशपासून असलेल्या धोक्यांपासून टीम इंडियाचा सावध राहण्याचा प्रयत्न करेल. बांगलादेशपासून भारताला काय धोके? 1. भारतावर 2-1 ने मालिका विजय बांगलादेशने भारताला 2007 सालच्या विश्वचषकात धूळ चारली होती. भारतासाठी हा पराभव धक्कादायक होता. असाच पराभवाचा धक्का बांगलादेशने भारताला अनेकदा दिला आहे. 2015 मध्ये झालेल्या वन डे मालिकेत बांगलादेशने भारतावर 2-1 ने विजय मिळवला होता. एवढंच नाही तर 2016 च्या टी-20 विश्वचषकात भारताची पराभवाची परिस्थिती झाली होती. मात्र महेंद्र सिंह धोनीच्या कामगिरीने भारताने हा सामना वाचवला. 2. सलामीवीर जोडीवर मदार चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाच्या सलामीवीर जोडीने चांगली भागीदारी रचली असली तरी पहिल्या 10 षटकांमध्ये धावांची संख्या फारच कमी आहे. भारताने गेल्या तीन सामन्यात पहिल्या 10 षटकांमध्ये पाकिस्तानविरुद्ध 46, श्रीलंकेविरुद्ध 48, श्रीलंकेविरुद्ध 48 आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केवळ 35 धावा केल्या आहेत. 3. खराब क्षेत्ररक्षण भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलचं तिकीट बूक केलं असलं तरी क्षेत्ररक्षण सुधारणं भारतासाठी महत्वाचं असणार आहे. कारण गेल्या काही सामन्यांमध्ये युवराज सिंह, केदार जाधव, रोहित शर्मा यांच्यासारख्या भरोशाच्या खेळाडूंकडून अनेक चुका झालेलं दिसून आलं. पाकिस्ताविरुद्धच्या सामन्यात केदार जाधवने दोन झेल सोडले, हार्दिक पंड्याने श्रीलंकेविरुद्ध कुशल मेंडिस आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हाशिम आमलाचा झेल सोडला. 4. तमीम इकबालचा धोका बांगलादेशचा स्फोटक फलंदाज तमीम इकबालला लवकरात लवकर माघारी पाठवण्याचं आव्हान भारतीय गोलंदाजांसमोर असेल. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात तमीम अपयशी ठरला असला तरी त्यापूर्वीच्या सामन्यांमध्ये त्याने बांगलादेशसाठी मोलाची भूमिका निभावली आहे. तमीमने इंग्लंडविरुद्ध 128, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 95 धावांची शानदार खेळी केली आहे. या चॅम्पियन्स ट्रॉफीत त्याच्या नावावर 223 धावा आहेत. 5. मुस्तफिजुर रहमानपासून सावधान! भारतीय फलंदाजांनी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली असली तरीही बांगलादेशच्या गोलंदाजांपासून सावध राहणं गरजेचं आहे. कारण मुस्तफिजुर रहमान हा बांगलादेशचं खरं अस्त्र आहे. कारण त्याने भारताविरुद्ध आतापर्यंत 3 सामन्यात 13 विकेट घेतल्या आहेत. तर रुबल हुस्सेनने गेल्या 4 सामन्यात दोन वेळा विराट कोहलीला माघारी पाठवलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Australia : बांगलादेशकडून झालेला पराभव जिव्हारी लागला, ऑस्ट्रेलियानं सलामीवीराला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर 
ऑस्ट्रेलियानं सलामीवीर बदलला, अपयशी खेळाडूला थेट घरचा रस्ता दाखवला, दुसऱ्या कसोटीसाठी संघ जाहीर
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
BCCIच्या अंपायरच्या तोंडावर लागला चेंडू! मैदानावरील सगळेच घाबरले; थेट ICUमध्ये दाखल; VIDEO पाहून धडकी भरेल
IND vs SL 1st Test DAY-4 : चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?
चौथ्या दिवसअखेर भारत वरचढ; पण श्रीलंकेची झुंज कायम! 288 धावा की 6 विकेट्स... आता पाचव्या दिवशी कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे आणि प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Embed widget