IND vs AUS 1st Test : 6 कसोटीत 1 शतक, 3 अर्धशतके! तरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीतून रोहितच्या लाडक्याचा होणार पत्ता कट?
India tour of Australia 2024-25 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरपासून 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे.
India tour of Australia 2024-25 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 नोव्हेंबरपासून 5 सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे, जी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीच्या या पहिल्या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा खेळणार हे निश्चित नाही. त्यामुळेच टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनवर बरीच चर्चा होत आहे. रोहितच्या अनुपस्थितीत भारतीय संघ सलामीच्या फलंदाजाच्या शोधात आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटीतून सर्फराज खानचा पत्ता कट होऊ शकतो.
देशांतर्गत कसोटीत सातत्याने चमकदार कामगिरी करणाऱ्या सर्फराज खानने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 150 धावांची खेळी केली होती. सर्फराज खानने आपल्या 6 कसोटी सामन्यांच्या छोट्या कारकिर्दीत 1 शतक आणि 3 अर्धशतकांच्या मदतीने 371 धावा केल्या आहेत. त्याची कसोटीतील सरासरी 37.10 आहे. पण सर्फराज खानला पर्थमध्ये खेळणे कठीण दिसत आहे. ऑस्ट्रेलियाच्या उसळत्या खेळपट्ट्या सर्फराज खानसाठी अडचणी निर्माण करू शकतात, असे मानले जात आहे. पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्कसारखे गोलंदाज या भारतीय खेळाडूसाठी अडचणीचे ठरू शकतात.
सरावाच्या वेळी सर्फराज खान दुखापत
पर्थ कसोटीपूर्वी सरावाच्या वेळी सर्फराज खानलाही दुखापत झाली होती. सर्फराज खाननंतर कोहली जखमी झाला होता. सर्फराज उजवा हात धरून बाहेर येताना दिसत आहे. दुखापत फारशी गंभीर नव्हती त्यामुळे स्कॅन करण्याची गरज नव्हती. या कसोटीत ऑस्ट्रेलिया-अ विरुद्धच्या दोन अनधिकृत कसोटी सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या सर्फराज खानच्या जागी ध्रुव जुरेलला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते.
ध्रुव जुरेलची कसोटी कारकीर्द
ध्रुव जुरेलने फेब्रुवारी 2024 मध्ये कसोटी फॉर्मेटमध्ये पदार्पण केले आहे. ध्रुवने 3 कसोटी सामन्यांच्या 4 डावात 63.33 च्या सरासरीने 190 धावा केल्या आहेत. या काळात ध्रुवने 90 धावांची खेळीही खेळली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ - यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), अभिमन्यू इसवरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, सरफराज खान, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आकाश दीप, आ. प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
राखीव : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.
हे ही वाचा -