राम गोपाल वर्मा यांच्या ‘वीरप्पन’ सिनेमातील काही वादग्रस्त सीन्सना कात्री लावण्यास सांगितले गेले.
2/9
2016 हे वर्ष संपायला अवघे पाच-सहा दिवस बाकी आहेत. सिनेसृष्टीवर नजर टाकली, तर यावर्षी अनेक हिंदी सिनेमांना सेन्सॉर बोर्डाने कात्री लावली. अनुराग कश्यपच्या ‘उडता पंजाब’ सिनेमाने तर कोर्टाची पायरी चढली. या सिनेमातील एकूण 89 सीन्स सेन्सॉर बोर्डाने कात्री लावण्याची मागणी केली. अखेर काही सीन हटवून डिस्क्लेमरसोबत सिनेमा रिलीज झाला.
3/9
‘मस्तीजादे’ सिनेमातील 349 सीन्सवर कात्री लावण्याची शिफारस सेन्सॉर बोर्डाने केली. सिनेमाला ए सर्टिफिकेट देऊन प्रदर्शनाची परवानगी देण्यात आली.
4/9
‘लव्ह के फंडे’ सिनेमातील बोल्ड सीन आणि डायलॉग्जवर आक्षेप घेत सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला ए सर्टिफिकेट दिले.
5/9
लव्ह गेम्स सिनेमावरुनही वाद झाला आणि ए सर्टिफिकेट देऊन रिलीज करण्याची परवानगी देण्यात आली.
6/9
अॅडल्ट कॉमेडी फिल्म ‘क्या कूल है हम 3’ सिनेमातील बोल्ड सीन्सवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला. 139 कटनंतर सिनेमाला A सर्टिफिकेट देऊन प्रदर्शनाची परवानगी देण्यात आली.
7/9
कतरिन कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘बार बार देखो’मधील एका सीनला कात्री लावण्यात आली.
8/9
सेन्सॉर बोर्डाने मनोज वाजपेयी यांच्या ‘अलीगढ’च्या ट्रेलरला A सर्टिफिकेट देऊन प्रदर्शनाची परवानगी दिली.
9/9
‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमात पाकिस्तानी कलाकार असल्याने वाद झाला होता. शिवाय, सिनेमातील एका सीनला कात्रीही लावण्यात आली.