मुलायम सिंह यादव यांनी अखिलेश यादव यांच्यासोबतच रामगोपाल यादव यांनाही बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यांना पक्षाची बैठक बोलावण्याचा अधिकार नसल्याचं मुलायम यांनी सांगितलं.
2/5
नुकतंच अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल (पीपीएल)पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. पीपीएलच्या 35 आमदारांसह एकूण 49 आमदारांचं आपल्याला समर्थन असल्याचा दावा पेमा खांडू यांच्या सरकारने केला आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभेत एकूण 60 आमदार आहेत.
3/5
बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांना राजीनामा देण्याच्या आदेशाचं पालन न केल्यामुळे जनता दल (युनायटेड) पक्षाने निलंबित केलं होतं.
4/5
उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या तोंडावर असताना तिथं आज मोठी उलथापालथ झाली. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि सपाचे सरचिटणीस रामगोपाल यादव यांना समाजवादी पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी आज हा निर्णय जाहीर केला. मात्र मुख्यमंत्री असताना एखाद्या नेत्याला पक्षातून निलंबित करण्याची ही पहिलीच वेळ नाही.
5/5
दरम्यान मुलायम सिंह यांनी उद्या सकाळी साडे 10 वाजता विधानसभेसाठी निवडलेल्या उमेदवारांची बैठक बोलावली आहे. यापूर्वी अखिलेश यादव यांनी 235 उमेदवारांची यादी जाहीर केली होती.