मात्र या प्रकारानंतर त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी उसळलेली गर्दी बघून उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींमध्ये चांगलीच कुजबूज रंगली होती.
6/8
शिवसेनेत नार्वेकरांना याआधीच वेगळं वलय होतं. त्यात पक्षाचं अधिकृत सचिवपद दिल्यामुळे आता मंत्री, खासदार, आमदारांप्रमाणेच कार्यकर्त्यांचाही मिलिंद नार्वेकरांभोवती गराडा पडू लागला आहे.
7/8
त्या व्यक्तीचं नाव ऐकलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्यांचं नाव आहे मिलिंद नार्वेकर. होय, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे नाही तर पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकरांसोबत फोटो काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी घेराव घातला होता.
8/8
शिवसेनेचा 52वा वर्धापन दिन मंगळवारी (19 जून) सोहळा साजरा झाला. या सोहळ्यात राज्यभरातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत सर्वाधिक फोटो काढण्यासाठी एका व्यक्तीकडे मोठी गर्दी उसळली होती.