एक्स्प्लोर
महाराष्ट्राला भिकारी बनवेन, आमदार तानाजी सावंत यांचं वादग्रस्त वक्तव्य
1/4

याप्रकऱणी एबीपी माझाने आमदार तानाजी सावंत यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. ते म्हणाले, “या व्हिडीओमध्ये मोडतोड करण्यात आली आहे. व्हिडीओतील एखादं वाक्य दाखवून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. संपूर्ण भाषण ऐकल्याशिवाय माझ्या म्हणण्याचा अर्थ लागणार नाही. मला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र तरीही माझ्यामुळे महाराष्ट्राची भावना दुखावली असेल तर मी बिनशर्त माफी मागतो”, असं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे.
2/4

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारावेळेस सावंत यांनी हे वक्तव्य केल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, आम्ही या व्हिडिओची सत्यता पडताळलेली नाही. तानाजी सावंत हे यवतमाळमधून शिवसेनेचे विधानपरिषदेतील आमदार आहेत.
Published at : 09 Mar 2017 10:44 AM (IST)
View More























