एक्स्प्लोर
'सत्तेच्या दरबारात मांडवली', शिवसेनेची मुख्यमंत्री-मनसेवर टीका
1/7

'चित्रपटगृहाचे पडदे जाळण्याची भाषा मुंबईने ऐकली, पण माचिस बॉक्स रिकामाच आहे. कारण ‘काड्या’ मुख्यमंत्र्यांनी जाकीटच्या खिशात ठेवल्या.'
2/7

'सत्तेच्या दरबारात मांडवली झाल्यामुळे महाराष्ट्रावरील संकट टळले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्ना निकाली निघाला. कारण ‘ये दिल है मुश्किल’ नामक चित्रपट वाजतगाजत प्रसिद्ध होत आहे.'
3/7

‘सत्तेच्या दरबारात मांडवली झाल्यानं महाराष्ट्रावरचं संकट टळलं.’ अशी बोचरी टीकाही शिवसेनेनं केली आहे.
4/7

‘शहीदांच्या बलिदानाची किंमत ५ कोटी समजायची का?’ असा जहरी वार आज शिवसेनेचं मुखपत्र सामनातून करण्यात आला आहे. अर्थातच मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यावरच शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
5/7

'पाक कलाकारांना अभय मिळाले असल्याने ‘पडदे’ एकदम सुरक्षित राहतील. पडद्यामागे बरेच घडले व सर्व विरोध वर्षा बंगल्यावरील चहाच्या पेल्यात विरघळून गेला. कोण जिंकले, कोण हरले या तपशिलात आम्हाला पडायचे नाही, पण या सर्व प्रकरणात आमच्या जवानांच्या हौतात्म्याचा अपमान झाला आहे.'
6/7

'मुख्यमंत्र्यांनी स्वत: सांगितले की, पाकिस्तानला लोकांचा विरोध आहे व पाक कलाकार आपल्या चित्रपटांत असणे संतापजनक आहे, पण सध्या हा पाक कलाकारांचा चित्रपट लावूनच टाका. कारण शेवटी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे ना ‘‘भौ’’!
7/7

सिनेमागृहाचे पडदे जाळण्याची भाषा करणारे आता तेच ‘पडदे’ अंगावर पांघरून शांतपणे पहुडले आहेत. जवानांच्या बलिदानाचे हे राजकारण असह्य आहे. आम्हाला आश्च‘र्य वाटते ते प्रखर राष्ट्रभक्त, राष्ट्रवादी वगैरे भारतीय जनता पक्षाचे.
Published at : 24 Oct 2016 09:26 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement
























