नेकांचं कौटुंबीक साहित्य उद्ध्वस्त झालं. अचानक पाणी आल्याने नेमकं काय होतंय हे कळलं नाही. अक्षरश: घराच्या भिंती कोसळल्या.
2/19
जनता वसाहतीमध्ये बैठी घरं आहेत. त्या घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरलं आहे. त्या वस्तीतील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरु आहे.
3/19
सध्या खडकवासला धरणातून पाणी सोडणं थांबवलं आहे. महापालिकेचे अधिकारी, पोलीस, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत, परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
4/19
5/19
पाण्याचा प्रवाह खूपच वेगात असल्यामुळे रस्त्यावर आणि घरात अल्पावधीतच गुडघाभर पाणी भरलं.
6/19
7/19
8/19
सिंहगड रोड परिसरात पाणी साचल्याने वाहतूक रखडली.
9/19
पाणी प्रचंड वेगाने वाहात दांडेकर पूल आणि परिसरात पोहोचलं. काहीवेळातच रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं.
10/19
11/19
पर्वती टेकडीच्या पायथ्यापासून हा पाण्याचा प्रवाह सुरु होता. तो भाग उंचीवर असल्याने आणि पाण्याचा वेग प्रचंड असल्याने रस्ते अक्षरश: पाण्यात बुडाले
12/19
दांडेकर पूल परिसरात बैठी घरं आहेत. त्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. थेट घरांत पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
13/19
फुटलेल्या पुलाचं पाणी दांडेकर पुलावर आलं आहे. रस्त्यावरील पाण्याचा प्रवाह हा इतका वेगात आहे की, त्या पाण्यात उभं राहण्यासाठी आधार घ्यावा लागतो.
14/19
या कालव्यात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग होतो. मात्र कालव्यातून पाणी अडवण्याची जी भिंत आहे, तीच भिंत कोसळली.
15/19
दांडेकर पूल आणि परिसरात पाणीच-पाणी साचलं आहे. सिंहगड रोड परिसरात पाणी साचल्याने वाहतूक रखडली आहे.
16/19
भिंत कोसळल्यानंतर अचानक पाण्याचा मोठा प्रवाह थेट रस्त्यावर आला. क्षणार्धात रस्त्यावर गुडघाभऱ पाणी जमा झालं. त्यामुळे नेमकं काय झालंय हे लोकांना कळलंच नाही.
17/19
दरम्यान, डागडुजी न केल्याने कालव्याची भिंत फुटल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
18/19
पर्वती भागात मुठा कालव्याची भिंत कोसळली आहे. जनता वसाहतीजवळ कॅनॉलची भिंत कोसळल्याने पुण्याच्या रस्त्यांवर महापूर आल्याचं चित्र आहे.
19/19
पर्वती टेकडीच्या पायथ्यापासून मोठ्या वेगाने पाणी रस्त्यावर येत आहे. पाणी खूप मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे पुराची स्थिती निर्माण झाली आहे.