LG G5 हा स्मार्टफोन पहिल्यांदा स्पेनमध्ये लाँच करण्यात आला होता. त्यानंतर आता भारतातही लाँच करण्यात आला आहे. एलजीचा हा पहिलाच फ्लॅगशीप स्मार्टफोन आहे.
2/6
LG G5 हा अँड्रॉईडच्या मार्शमेलो या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. यामध्ये 2800 mAh क्षमतेची रिमुव्हेबल बॅटरी आहे. या फोनचं वजन केवळ 159 ग्रॅम एवढं असून यामध्ये वायफाय, जीपीएस, एलटीई, ब्ल्यूटूथ आणि एनएफसी कनेक्टीव्हीटी आहे.
3/6
LG G5 ला 5 इंचचा डिस्प्ले आहे, ज्याचे रिझॉल्युशन qHD 2560x1440 पिक्सेल आहे. या फोनचा डिस्प्ले स्लीप मोड असतानाही चालू राहतो. याशिवाय या फोनमध्ये 820 क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 4 GB चा जबरदस्त रॅम आणि 32 GB ची इनबिल्ट मेमरी दिलेली आहे. जी 2 TB पर्यंत वाढवली जाऊ शकते.
4/6
LG G5 चा मुख्य कॅमेरा 16 मेगापिक्सेलचा तर दुसरा कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा आहे, जो वाईड अँगल शॉट्स घेतो. तर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेल कॅमेरा आहे.
5/6
LG G5 ची किंमत 52 हजार 900 रुपये आहे. या फोनसोबत एलजी फ्रेंड्स रेंजचे अनेक उपकरणं उपलब्ध आहेत. एलजी कॅम प्लस, एलजी 360 कॅम आणि एलजी 360 व्हीआर अशा उपकरणांचा यामध्ये समावेश आहे.
6/6
एलजी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने आपला बहुप्रतिक्षीत LG G5 हा फ्लॅगशीप स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. या फोनची विशेषता म्हणजे यामध्ये डबल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. हे दोन्ही कॅमेरे वेगवेगळे कार्य करतात.